वैद्यकीय विश्वातील निष्काळजीपणावर प्रकाशझोत टाकत या विषयाकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधणारी ‘सेकंड ओपिनियन’ ही नवी मालिका एबीपी माझा वाहिनीवर शनिवारपासून (१५ डिसेंबर) सुरू होणार असून, या मालिकेचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी करणार आहेत.
एबीपी माझा वाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. काही सत्य घटनांचे नाटय़रूपांतरण, वैद्यकीय निष्काळजीपणामुळे बळी गेलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या मुलाखती आणि या सर्व घटनांमागील वैद्यकीय आणि कायदेशीर बाजू असे ‘सेकंड ओपिनियन’चे स्वरूप असणार आहे. दर शनिवारी रात्री नऊ वाजता या मालिकेचे प्रक्षेपण होणार आहे. त्याचे पुनप्रक्षेपण रविवारी सकाळी साडेदहा आणि रात्री नऊ वाजता होणार आहे. एकूण तेरा भागांमध्ये ही मालिका प्रदर्शीत केली जाणार आहे.
अतुल कुलकर्णी म्हणाले, ‘‘सेकंड ओपिनियन’ ही नुसती मालिका नसून तो एक सामाजिक जागरूकता करणारा उपक्रम आहे. जेणेकरून वैद्यकीय निष्काळजीपासून लोक वाचतील व आपल्या आधिकारांबाबत जागरूक होतील अशी अपेक्षा आहे.’   

Story img Loader