जम्मू-काश्मिरातील प्रलयंकारी आपत्तीशी सामना करण्यासाठी देशभरातून मदतीचा ओघ वाढला असून, येथील विवेकानंद रुग्णालयाने वैद्यकीय पथक रवाना केले.
रा. स्व. संघाचे जम्मू-काश्मीर प्रांत संघचालक ब्रिगेडियर सुचेतसिंह यांच्या नेतृत्वाखाली सहायता समिती स्थापन झाली. रुग्णालयाचे डॉ. अशोक कुकडे यांच्याशी सुचेतसिंह यांनी चर्चा करून वैद्यकीय पथकाची मागणी केली. त्यानुसार हे पथक जम्मू-काश्मीरला रवाना झाले. डॉ. मंगेश वळसंगकर, डॉ. बाजीराव जाधव यांच्यासह दोन सहायक कर्मचारी या पथकात आहेत. हे पथक जम्मू-काश्मीरमध्ये १५ दिवस कार्यरत राहील. या सेवाकार्यात मदत पाठवू इच्छिणाऱ्यांनी रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन अध्यक्ष डॉ. दिलीप देशपांडे व प्रशासकीय अधिकारी अनिल अंधोरीकर यांनी केले आहे.

Story img Loader