महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्राधिकरण मंडळ सदस्यांमधून विविध विद्या शाखांच्या अधिष्ठातांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती विद्यापीटाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. आदिनाथ सूर्यकर यांनी दिली.
वैद्यकीय विद्या शाखेवर एस. आर. टी. आर. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. सुधीर देशमुख, दंत विद्याशाखेवर औरंगाबादच्या सी. एस. एम. एस. एस. दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भोयर, आयुर्वेद व युनानी विद्याशाखेवर पुण्याच्या अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. सतीश डुंबरे आणि होमिओपॅथी विद्याशाखेवर खामगावच्या पंचशील होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विरेंद्र कविश्वर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा