देशाच्या भावी राजकारणाबद्दल सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासोबत विस्ताराने अत्यंत सकारात्मक चर्चा झाली असून ती सार्थकी होती, असे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी शुक्रवारी सांगितले. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी दिवसभर चर्चा केल्यानंतर दिल्लीला रवाना होण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.
या चर्चेचा तपशील विस्ताराने सांगण्यास अडवाणी यांनी नकार दिला. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला अडवाणींनी हजेरी लावली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अडवाणी सरसंघचालकांच्या भेटीसाठी नागपुरात धडकले. त्यामुळे अडवाणींना या भेटीतून एखादे मोठे ठोस आश्वासन मिळाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Story img Loader