आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली नसली तरी, सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारी लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनीही नुकताच दिल्ली जाऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक घेतली. याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील महाराष्ट्र दौऱ्यावर असून पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. दरम्यान, आता विधानसभा निवडणुकीच्या रणनीती संदर्भात महायुतीच्या नेत्यांमधेही खलबंतं झाली आहेत.

गुरुवारी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महायुतीचे इतर नेतेही उपस्थित होते. या बैठकीनंतर आमदार प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधत या बैठकीतील चर्चेबाबत माहिती दिली.

Demand money from company owner in name of MLA Pune news
आमदाराच्या नावाने कंपनी मालकाकडे पैशांची मागणी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
कसब्यात एक ॲक्सिडेंटल आमदार तयार झाला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रविंद्र धंगेकर यांना टोला
former ministers who rebel and won
अनेक माजी मंत्री, आमदारांचा बंडखोरी करून विजयाचा इतिहास, देशमुख, केदार, बंग, जयस्वाल आदींचा समावेश
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
assembly seats in cities near mumbai important for mahayuti
मुंबईलगतची महानगरे विधानसभेतही  शिंदे-फडणवीसांना साथ देणार का? येथील जागा महायुतीसाठी महत्त्वाच्या का?
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं

हेही वाचा – Manoj Jarange on Prasad Lad: आमदारकीची ऑफर; मनोज जरांगेंनी प्रसाद लाड यांना दिलं उत्तर.

नेमकं काय म्हणाले प्रसाद लाड?

“विधानसभेच्या रणनीतीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत ७ विभागांत व २८८ विधानसभेतील विभागनिहाय चर्चा झाली. त्यानुसार राज्यात महायुतीचा समन्वय दौरा आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक विभागात मुख्यमंत्री उपमुख्यंत्र्यांच्या जारी सभा होणार आहे. तसेच संवाद दौरा देखील आयोजित करण्यात आला आहे. राज्यात अशा एकूण सात सभा होतील. याशिवाय आठवी समाप्तीची सभा मुंबईत पार पडेल, असं प्रसाद लाड म्हणाले.”, असं प्रसाद लाड म्हणाले.

२० ऑगस्ट रोजी महायुतीच्या प्रचाराला सुरुवात

पुढे बोलताना, “येत्या २० ऑगस्ट रोजी कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचे दर्शन घेऊन महायुतीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. महायुतीच्या नेत्यांचे दौरे आणि जाहीर सभा येत्या २० ऑगस्टपासून कोल्हापूर येथून सुरू होईल. यावेळी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यंत्री उपस्थित राहतील. महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर जाहीर सभा पार पडेल”, अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा – Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : “मला सांगा, राहुल गाधींनी कुठे हिंदुत्वाचा अपमान केला?” उद्धव ठाकरेंचा थेट सवाल; म्हणाले, “प्रभू शंकराचा फोटो दाखवण्यावर…”

“सात ते दहा दिवसांचे असतील महायुतीच्या नेत्यांचे दौरे”

दरम्यान, “महायुतीच्या नेत्यांचे हे दौरे साधारण सात ते दहा दिवसांचे असतील. प्रत्येक दिवशी दोन किंवा तीन विधानसभा कव्हर करण्याचा आमचा प्रयत्न असेल. यावेळी महायुतीचे इतर नेतेही मेळावे घेतील. यामाध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल”, असेही प्रसाद लाड यांनी सांगितले.