शहरातील वसंत व्याख्यानमाला या संस्थेची ९२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी ११ वाजता द्वारका परिसरातील ऋणानुबंध मंगल कार्यालयात होणार आहे. मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मंजूर करणे, मे २०१३ मध्ये आयोजित करावयाच्या व्याख्यानमालेतील कार्यक्रमांविषयी चर्चा करणे, २०१२-२०१३ वर्षांच्या हिशेब पत्रकास मंजुरी देणे, २०१३-२०१४ च्या अंदाज पत्रकास मंजुरी देणे, २०१३-२०१४ या आर्थिक वर्षांकरिता सनदी लेखापालाची नियुक्ती करणे, संस्थेच्या घटनेतील तरतुदीनुसार कार्यकारी मंडळाची निवड करणे यांसह अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. सभासदांनी सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा