रत्नागिरी : उद्योग मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग व संरक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी कंपनी निबे लि. यांच्यात रविवारी सामंजस्य करार करण्यात आला. संरक्षण क्षेत्रातील उत्पादन निर्मितीसाठी निबे कंपनी रत्नागिरीत १ हजार कोटी गुंतवणूक करणार आहे. त्यातून सुमारे दीड हजार रोजगार निर्मिती होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृहात डिफेन्स प्रदर्शन कम सेमिनारचे उद्घाटन पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, एमआयडीसीचे मुख्‍य अभियंता प्रकाश चव्हाण, निवृत्त व्हायस ॲडमिरल सुनिल भोकरे, निबे कंपनीचे किशोर धारिया, बाळकृष्ण स्वामी, भावेश निबे, प्रकाश भामरे, निवृत्त कंमाडर सौरभ देव आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-ऐतिहासिक विजयदुर्ग किल्याचे जागतिक वारसा स्थळ यादीत नाव

पालकमंत्री सामंत म्हणाले, महाराष्ट्रासाठी आजचा कार्यक्रम महत्वाचा आहे. देशाच्या संरक्षणासाठी काय केले पाहिजे, हे सांगणारा आजचा कार्यक्रम आहे. निबे कंपनी रत्नागिरीमध्ये १ हजार कोटींची गुंतवणूक करीत आहे. त्यामधून एक ते दीड हजार रोजगार निर्मिती होणार आहे. बंदूक हातात घेऊन सीमेवर राहूनच देशसेवा करता येते असे नाही, संरक्षण क्षेत्रात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. त्यातूनही देशाच्या संरक्षणाचे धडे मिळतात. हजारो नोकऱ्या मिळू शकतात, त्यातून देश सेवा घडू शकते. सैनिकांचा आदर सर्वांना असला पाहिजे. ते देशाच्या सीमेवर रक्षण करतात, म्हणून आपण शांतपणे झोपू शकतो, ही भावना सर्वांनी ठेवायला हवी. माजी सैनिकांचे देशाप्रती असणारे योगदान विसरुन चालणार नाही.असे कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात व्हायला हवेत.

आधुनिक तंत्रज्ञानाचे हेलिकॉप्टर नाशिकला तयार होते. रस विक्री करणारे निबेंनी डिफेन्सचे, महाराष्ट्राचे नाव जगावर नेले आहे. जी बंदूक परदेशातून २ लाख ३७ हजार रुपयांना आयात करायला लागायची, ती बंदूक निबेंनी मेक इन इंडियामध्ये केवळ ३७ हजार रुपयांमध्ये तयार केली. अशा क्षेत्रात रत्नागिरीकरांनी सहभागी झाले पाहिजे. जिल्ह्यात राहूनच अशी प्रगती विशेषत: तरुणांनी करायला हवी. अजूनही एक फार मोठा डिफेन्सशी निगडीत प्रकल्प रत्नागिरीत येत आहे. दहा हजार नोकऱ्या द्यायच्या आहेत. जिल्ह्यातील युवकांनी मुंबईला न जाता जिल्ह्यातील अशा प्रकल्पात सामील व्हावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

आणखी वाचा-Eknath Shinde : “उद्धव ठाकरेंनी त्यांना मुख्यमंत्री व्हायचं हे मला सांगितलं असतं तर…”, एकनाथ शिंदेंचं महत्त्वाचं वक्तव्य

पोलीस भरतीमध्ये होमगार्डमधील पाच टक्के जागा असतात. पण, आपली मुले होमगार्ड व्हायला लाजतात. स्थानिकांनी याचा विचार करावा. स्थानिक मुलांनी पोलीस दलात भरती होण्यासाठी त्यांना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यासाठी डिपीसीमधून निधी दिला जाईल. त्याचे नियोजन करावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांना केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Memorandum of understanding between department of industries and nibe company mrj