नगर :  आईचा खून केल्यानंतर मनोरुग्ण तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहराजवळील भिंगार येथे घडली. नंदा बापू बेंद्रे (४७) व राहुल बापू बेंद्रे (२४) अशी या दोघांची नावे असल्याचे भिंगारच्या कँप पोलिसांनी सांगितले. दोघांचा मृतदेह मध्यरात्री भिंगारमधील राहत्या घरी, लकार गल्लीत आढळला. आईचा गळा आवळुन खून केल्यानंतर राहुल याने घरातच गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल हा मनोरुग्ण असून त्याच्यावर लहानपणापासुनच नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लहान मुलांसारखे हट्ट करणे, खाऊ किंवा खेळणी न मिळाल्यास चिडचिड करणे असे तो वागत असे. त्याचे वडिल बापू बेंद्रे हे महानगरपालिकेत पाणी पुरवठा विभागात काम करतात. ते विळद पंपीग स्टेशन येथे नियुक्त आहेत. त्यांना तीन मुले आहेत. मोठा मुलगा विवाहित असून  तो घरगुती कामासाठी पत्नीला घेऊन बाहेरगावी गेला होता. तर बापू बेंद्रे यांना पक्षाघाताचा त्रास होत असल्याने सर्वात धाकटा मुलगा त्यांना घेऊन कामावर, विळद घाट येथे गेला होता.