सर्वसामान्यांसाठी खुशखबर असून लवकरच म्हाडाच्या घरांची लॉटरी निघणार आहे. मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये म्हाडाच्या घरांची लॉटरी निघणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होण्याआधी ही लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती आहे. म्हाडा अध्यक्षांनी यासंबंधी घोषणा केली आहे. आपल्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांना यानिमित्ताने पुन्हा एकदा आपलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये लवकरच म्हाडाची लॉटरी निघणार आहे. आचारसंहिता लागू होण्याआधी याची अधिकृत घोषणा होईल. पुण्यात ४४६४ घरांसाठी तर नाशिकमध्ये एक हजार घरांसाठी लॉटरी निघणार आहे. तर मुंबईत २३८ घरं आणि १०७ गाळ्यांसाठी लॉटरी निघणार आहे. याशिवाय औरंगाबादमध्ये ८०० घरांसाठी लॉटरी निघणार आहे. तर आचारसंहिता संपल्यानंतर कोकण विभागात नऊ हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Story img Loader