Satya Nadella on Agricultural Development Trust Baramati: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बारामतीमधील विकासकामांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी जोरदार दावे केल्याचं पाहायला मिळालं. कुणी किती वर्षं बारामतीसाठी काम केलं, याचेही हिशेब मांडण्यात आले. पवार कुटुंबात सध्या फूट पडली असली, तरी बारामती आणि पवार कुटुंब हे सूत्र गेल्या पाच दशकांपासून कायम असल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी शरद पवारांनी स्थापन केलेल्या एका संस्थेचं त्यांच्या सोशल मिडिया पोस्टमध्ये कौतुक केल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांनीदेखील सत्या नडेलांच्या या कौतुकाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

सत्या नडेला यांनी बारामतीमधील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट अर्थात ADT ला बुधवारी भेट दिली. यावेळी त्यांनी तिथल्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली. तसेच, या प्रकल्पाचं कामदेखील त्यांनी पाहिलं. यानंतर संध्याकाळी सत्या नडेला यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टमधून शरद पवारांनी स्थापन केलेल्या या संस्थेचं कौतुक केलं आहे.

Tirupati Stampede Latest Updates| Stampede at Tirupati bairagipatteda token counter
Tirupati Stampede: तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी का झाली? त्यावेळी नेमकं काय घडलं? कारण आलं समोर!
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Dhanashree Verma break silence on Divorce Rumours
Dhanashree Verma : युजवेंद्र चहलबरोबर घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान धनश्री वर्माचे ट्रोल्सना चोख उत्तर; म्हणाली, “माझे मौन हे…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Donald Trump
Donald Trump : आम्हीच अमेरिकेतली काही राज्ये विकत घेतो! कॅनडाच्या नेत्यानं डोनाल्ड ट्रम्प यांनाच दिली ऑफर
devendra fadnavis reaction on harshwardhan patil about join ncp sharad pawar group
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “आर. आर. आबा आता हयात नाहीत, पण एवढंच सांगतो की…”, देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांच्या दाव्यावर उत्तर!
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

काय म्हणाले सत्या नडेला?

“आज बारामतीमधील एडीटीच्या टीमला भेटून फार आनंद झाला. ही टीम शेतकऱ्यांना आरोग्यदायी व टिकाऊ उत्पादनं घेण्यात मदत करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं एआय टूल वापरत आहे”, असं नडेला यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

दरम्यान, मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून बारामती एडीटीसंदर्भातला एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्यात बारामती एडीटीच्या कामाचा उल्लेख करण्यात आला आहे.

शरद पवारांनी मानले आभार

दरम्यान, शरद पवारांनी सत्या नडेला यांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत त्यांचे आभार मानले आहेत. “एआयआधारित शेतीचे फायदे अधोरेखित केल्याबद्दल धन्यवाद सत्या नडेला. बारामतीमधील शेतकऱ्यांना शेती करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक फायदा मिळावा ही बारामती एडीटीची बांधीलकी आहे. शिवाय मायक्रोसॉफ्टच्या मदतीने तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर होईल याची खात्री करण्याचाही आमचा प्रयत्न आहे”, असं शरद पवारांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय आहे Baramati ADT?

बारामती एडीटीची स्थापना शरद पवार व त्यांचे मोठे बंधू आप्पासाहेब पवार यांनी १९६८ साली केली होती. शेती उद्योग व शिक्षण क्षेत्रामध्ये विकासाभिमुख उपक्रम राबवण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. बारामतीमधील दुष्काळग्रस्त भागात पर्कोलेशन टँकच्या उभारणीचं काम एडीटीकडून करण्यात आलं होतं.

Story img Loader