कराड : कोयना परिसराला आज बुधवारी दुपारी ३ वाजून २८ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. कोयना भुकंप वेधशाळेत या भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टेर स्केल असल्याची नोंद झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेषतः पाटण व शिराळा तालुक्यातील काही भागासह पोफळी परिसरात हा भूकंप जाणवला. कोयना धरणस्थळावरील भूकंप वेधशाळेतील ‘एमईक्यू- ८००’ या भूकंप मापन उपकरणावर या धक्क्याची नोंद झाली आहे. त्यानुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या पश्चिमेला १३.६ किलोमीटरवर असून, त्याची खोली सुमारे १५ किलोमीटरवर आहे.

हेही वाचा…सांगली : कडेगावमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मोहरम उत्साहात

भूकंपाचा हा धक्का सौम्य स्वरूपाचा असून, त्याने कोयना धरणाला कोणतीही इजा पोहचलेली नसल्याचे कोयना भूकंप वेधशाळा व्यवस्थापन प्रमुखांनी स्पष्ट केले आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील पोफळी परिसराला सुद्धा या भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून १३.६ किलोमीटर अंतरावर होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून १३.६ किलोमीटर अंतरावर होता. तसेच या भूकंपाची खोली १५ किलोमीटर होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mild earthquake hits koyna area recorded centre point earthquake western side of helwak village psg
Show comments