लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : चांदोली धरणाच्या परिसरात बुधवारी पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का बसला. यामुळे धरणाला कोणतीही हानी झाली नसून धरण सुरक्षित असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
आणखी वाचा- लोटे येथील एक्सेल कंपनीतून वायू गळती; ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन
आज पहाटे ४.४६ वाजता भूकंपाचा धक्का जाणवला वारणावती येथील भूकंप मापन केंद्रावर याची तीव्रता ३ रिश्टर नोंदली गेली असून यामुळे कोणतीही हानी झालेली नाही. भूकंपाचे केंद्र मापन केंद्रापासून आठ किलोमीटर होते. पावसाने विश्रांती घेतलेल्या काळात हा भूकंपाचा धक्का बसल्याने काही नागरिक घराबाहेर पडले होते.