सोलापूर शहर व जिल्ह्यात आज(शनिवार) सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू शेजारच्या कर्नाटकातील ऐतिहासिक विजापूरजवळ असल्याची माहिती समोर आली. विजापूर परिसरात झालेला भूकंप ४.६ रिश्टर स्केलपर्यंत नोंदविण्यात आला. जिल्हा प्रशासनाने या घटनेस दुजोरा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापुरात काल दुपारपासून पावसाची रिपरीप चालू असून शनिवारी पहाटेही पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यावेळी सकाळी ६.२२ वाजता काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. मंगळवेढा येथे भूकंपाचे धक्के जाणवल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.

सोलापूरपासून विजापूर शंभर किलोमीटर अंतरावर असून मंगळवेढ्यापासूनही विजापूर तेवढ्याच अंतरावर आहे. विजापूरपासून १० किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. मात्र या भूकंपामुळे विजापूर भागात कोणतीही जीवित आणि मालमत्ताविषयक हानी झाली नसल्याचे तेथील प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mild tremors in solapur bijapur area msr