काँग्रेसमधील युवा नेतृत्त्व आणि दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षाला रामराम ठोकून शिवसेना शिंदे गटाचं धनुष्यबाण हाती घेतलं. काँग्रेसमध्ये व्हिजन उरलं नसून शिंदे गटाकडे महाराष्ट्रासाठी व्हिजन आहे, असं सांगून मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. तसंच, यावेळी त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्त्वावरही शंका उपस्थित केली होती. राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रा सुरू करण्याच्या मुहूर्तावरच मिलिंद देवरा यांनी पक्षसोडीचा मुहूर्त आखल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या. देवरा कुटुंबियांचे गांधी कुटुंबियांशी जवळपास ५५ वर्षांचं नातं होतं. हे नातं एका झटक्यात तोडून मिलिंद देवरा शिवसेनेत आले. यावरून ठाकरे गटाने टीका केली आहे. दैनिक सामनाच्या अग्रलेखातून त्यांनी मिलिंद देवरा यांनी स्वतःची अवहेलना करू नये, असं आवाहन केलं आहे.

“माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडले आहे. देवरा कुटुंबाचे काँग्रेसचे ५५ वर्षांचे संबंध होते. मुरली देवरा हे मुंबई काँग्रेसमधील बडे प्रस्थ होते व गांधी कुटुंबात मुरली देवरा यांचे वजन होते. केंद्रात देवरा कुटुंबाने सर्वोच्च पदे भूषविली ती काँग्रेसमुळेच. पण मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा आता त्याग केला व महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या ‘मिंधे’ गटात सामील झाले. काँग्रेस हा एक विचार होताच, पण ‘मिंधे’ गट म्हणजे कोणता विचार आहे की ज्यासाठी ५०-५० वर्षांचे काँग्रेसशी नाते त्यांना तोडावेसे वाटले?” असा सवाल ठाकरे गटाने विचारला.

manoj jarange patil criticized devendra fadnavis
“आता देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही”, आचारसंहिता जाहीर होताच मनोज जरांगेंचा थेट इशारा; म्हणाले…
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
CM Eknath Shinde IMP News
Baba Siddique Shot Dead : “बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवणार, एकालाही..”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
natasha awhad post on baba siddique murder
“लॉरेन्स बिश्नोई गँगने माझ्या बाबांनाही…”; बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर जितेंद्र आव्हाडांच्या मुलीची पोस्ट चर्चेत!
Sharad Pawar criticism that such rulers have not been seen in the history of the maharshtra state pune print news
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी; म्हणाले, “गृहमंत्री एवढ्या सौम्यतेने…”
Supriya Sule slams Ajit Pawar group on Pune Accident
Supriya Sule slams Ajit Pawar group: “त्यांच्या दोन्ही हाताला रक्त…”, सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटावर प्रहार; म्हणाल्या, “मी स्वतः त्यांच्याविरोधात…”
aditya thackeray devendra fadnavis
“…तर इगो कुणाचा दुखावतोय, हे कळेल”; देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपाला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर!
sushma andhare replied to amurta fadnavis
Sushma Andhare : “त्या आमच्या लाडक्या भावजय, पण कधी-कधी…”; सुषमा अंधारेंचा अमृता फडणवीस यांच्यावर पलटवार!

मुरलीभाई देवरा यांच्या आत्म्यास यामुळे अतोनात यातना झाल्या असतील

“राहुल गांधी यांच्या अंतस्थ गोटात मिलिंद देवरा यांचा समावेश होता. पण गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’स रविवारपासून सुरुवात होत असतानाच देवरा यांनी काँग्रेसला सोडले. हा मुहूर्त भाजपाने काढला असावा. देवरा हे लोकसभेच्या दोन निवडणुका सातत्याने हरले व ज्या दक्षिण मुंबईतून त्यांना तिसऱ्यांदा लढायची इच्छा होती त्या जागेवर शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आहेत. त्यामुळे सध्याच्या महाआघाडीत या जागेवर काँग्रेसला लढता येणे शक्य नव्हते. देवरा यांनी या जागेसाठी आग्रह धरला व शेवटी ५० वर्षांचे नाते तोडून ते मिंधेवासी झाले. काँग्रेसशी निष्ठा वाहिलेल्या त्यांच्या पिताजींच्या म्हणजे मुरलीभाई देवरा यांच्या आत्म्यास यामुळे अतोनात यातना झाल्या असतील”, अशी टीकाही या अग्रलेखातून करण्यात आली.

खोक्यांच्या माध्यमातून जन्मास आलेल्या मिंधे गटास व्हिजन आहे?

“मिलिंद देवरा म्हणतात, ”एकनाथ शिंदें यांचे व्हिजन खूपच मोठे आहे. पंतप्रधान मोदी व शहा यांचेही देशासाठीचे व्हिजन मोठे आहे. मोदीविरोध हाच काँग्रेसचा कार्यक्रम आहे. तो मला मान्य नाही.’ तर काँग्रेसचा त्याग करताना मिलिंद देवरा यांनी त्यांचे व्हिजन स्पष्ट केले. काँग्रेसने गेल्या ७० वर्षांत देशात काहीच केले नाही व काँग्रेसला व्हिजन नव्हते व नाही हे त्यांचे म्हणणे आहे. पण या व्हिजन नसलेल्या पक्षानेच माधवराव शिंदे, मुरली देवरा अशांचे नेतृत्व उभे करून त्यांना सत्तेत आणले. आज ज्योतिरादित्य शिंदेही भाजपात गेले व मिलिंदभाई थेट मिंधे गटात गेले. फक्त दीडेक वर्षांपूर्वी शिवसेना फुटीतून, खोक्यांच्या माध्यमातून जन्मास आलेल्या मिंधे गटास व्हिजन आहे असा साक्षात्कार मिलिंद देवरा यांना झाला. मिंधे गटाने महाराष्ट्राची जी लूटमार चालवली आहे तेच व्हिजन असेल तर काय करावे?”, असा उपहासात्मक टोलाही ठाकरे गटाने लगावला.

मिलिंद देवरा यांनी मिंधे गटात जाण्याचे खरे कारण सांगायला हवे

“महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेला जात असताना मुख्यमंत्री मिंधे हे स्वच्छ, चकचकीत मंदिरांच्या लाद्यांवर फडकी मारीत फिरत आहेत. यास ‘व्हिजन’ म्हणायचे काय? देवरा यांनी व्हिजनच्या गप्पा मारण्यापेक्षा आपण मिंधे गटात जाण्याचे खरे कारण सांगायला हवे. काँग्रेस पक्ष सोडणे व वेगळा निर्णय घेणे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्यांनी व्हिजनचा मुद्दा उकरून काढला आहे. मोदीविरोध हाच काँग्रेसचा कार्यक्रम आहे, असे देवरा म्हणतात. या कार्यक्रमात कधीकाळी आपण स्वतःही सामील झाला होता व त्या व्हिजनचे आपणही समर्थक होता”, असं ठाकरे गटाने म्हटलं.

राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी

“मोदी व त्यांच्या लोकांनी देशात संविधान, कायदा, नियम तसेच घटनात्मक संस्थांची नासधूस चालवली आहे. ‘हम करे सो कायदा’ हे त्यांचे धोरण आहे. आपल्या भांडवलदार मित्रासाठी देशाची सार्वजनिक संपत्ती त्यांनी विकायला काढली आहे. राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी चालली आहे. या झुंडशाहीविरोधात आवाज उठवणे हे देशभक्त राष्ट्रीय पक्षांचे काम आहे. राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रा’ त्याच हेतूने काढली आहे. मिलिंद देवरा त्या न्याय यात्रेत सामील होण्याऐवजी मिंधे प्रा. लिमिटेड कंपनीत सामील झाले”, अशी टीका ठाकरे गटाने केली.

मिंधे यांच्या गटासाठी देवरांचे महत्त्व काय?

“मिंधे गटाने मोदी-शहांच्या सहकार्याने शिवसेनेवर दरोडा टाकला. त्या दरोड्यास जनतेचा पाठिंबा नाही. महाराष्ट्राचे मांगल्य व स्वाभिमानाला चूड लावणाऱ्या या चोर मंडळात कुणाला व्हिजन दिसत असेल तर ते व्हिजन त्यांनाच लखलाभ ठरो. कधीकाळी इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग यांचे बेजोड नेतृत्व मिलिंद देवरा यांनी स्वीकारले, पण आता मिंध्यांच्या खुज्या-पोरकट नेतृत्वाखाली त्यांना काम करावे लागेल. मिंधे यांच्या गटासाठी देवरांचे महत्त्व काय?” असा प्रश्नही ठाकरे गटाने उपस्थित केला.

देवरांच्या रुपाने मिंधेंना दिल्लीत दूत मिळाले

“मिलिंद देवरा यांना कोणताही खास जनाधार नाही. उद्योगपतींच्या वर्तुळात त्यांचा वावर आहे. मिंधे गटास दिल्लीत त्याकामी एक ‘दूत’ मिळाला व देवरा यांना फार तर मिंधे गटाचे दिल्लीतील ‘दूत’ म्हणून काम मिळेल. बदल्यात राज्यसभा मिळेल. उद्योगपतींच्या मध्यस्थीनेच देवरा मिंधे गटात पोहोचले. मिंधे गटास दिल्लीत एक ‘पटेल’ मिळाले व देवरांना नवे व्हिजन मिळाले. यात राष्ट्रकारण व समाजकारण अजिबात नाही. महाराष्ट्राच्या हिताचा तर विषयच नाही. देवरा यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न, पण मिंधे गटाच्या व्हिजनमुळे काँग्रेस सोडली, असे बोलून त्यांनी स्वतःचीच अवहेलना करू नये, इतकेच!”, असा सल्लाही या अग्रलेखातून देण्यात आला आहे.