केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात काल (शनिवार) चार तास झालेल्या बैठकीनंतर, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना हे पक्षाचे मूळ नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई करण्यात आली आहे. आता दोन्ही गटांना स्वत:च्या पक्षासाठी नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे. सोमवारी, १० ऑक्टोबरला दुपारी १ वाजेपर्यंत नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय आयोगाकडे सादर करण्याचा आदेशही देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “ कितीही आपटली तरी ‘ठाकरे’ नावाचे वलय काढून घेण्यास…”; अंबादास दानवेंची शिंदे गटावर टीका

आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी धक्कादायक असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. कालपासून विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. दरम्यान शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी एक फोटो ट्वीट करत हे आमचं चिन्हं असल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा : “ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे बनावट प्रतिज्ञापत्र सादर केले”; नरेश म्हस्केंचा गंभीर आरोप!

मिलिंद नार्वेकर यांनी वाघाचा फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे आणि त्याखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे असं लिहिलेलं आहे.

तर दुसरीकडे अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी शिवसेना नाव वापरण्यास घालण्यात आलेली तात्पुरती बंदी किंवा धनुष्यबाण चिन्ह गोठविण्यात आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या वादातील अर्धी लढाई जिंकल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे, दोन्ही गटांनी पर्यायी नावांबाबत विचारविनिमय सुरू केला आहे. तर शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयोगाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटांमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

पाहा व्हिडीओ –

आज दोन्ही गटाच्या बैठका –

शिवसेनेच्या काही नेत्यांनी शिवसेना (बाळासाहेब ठाकरे किंवा महाराष्ट्र )अशी काही पर्यायी नावे आणि काही निवडणूक चिन्हांचा अंधेरी पोटनिवडणुकीसाठी विचार केला जाईल, असे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक खासदार-आमदारांची रविवारी सायंकाळी बैठक आयोजित केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Milind narvekar shared a photo on social media regarding shiv senas symbol msr
First published on: 09-10-2022 at 08:24 IST