महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीनं बुधवारी अटक केली. त्यांच्या अटकेनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ईडीच्या या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. यासंदर्भात राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून त्यावरून आज एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओवैसी सध्या उत्तर प्रदेशमध्ये पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. त्यांच्या प्रचारसभेमध्ये शनिवारी बोलताना ओवैसींनी समाजवादी पक्षासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील निशाणा साधला. “आजम जेलमध्ये असताना अखिलेश यादव बाहेर कसे आहेत हे सांगा. सपावाल्यांनो, तुम्ही माझा सामना करू शकणार नाहीत”, असं ते म्हणाले. मात्र, यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या अटकेवर देखील निशाणा साधला.

“महाराष्ट्रात काय होतंय हे?”

“महाराष्ट्रात नवाब मलिक जेलमध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याविरोधात जलसिंचन घोटाळ्याचा आरोप आहे. ते बाहेर आहेत आणि नवाब मलिक जेलमध्ये आहेत. काय होतंय हे?” असा सवाल ओवैसी यांनी केला आहे.

नवाब मलिकांच्या घरी नेमकं घडलं काय? मुलगी निलोफर यांनी केला खुलासा; म्हणाल्या, “सकाळी ६ वाजता…”

नवाब मलिक यांनी आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली बुधवारी अटक करण्यात आली. त्यांच्या घरी बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ईडीच्या पथकानं धाड टाकली. त्यानंतर तासाभराने त्यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आलं. तिथे दुपारी तीनच्या सुमारास त्यांना अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर नवाब मलिक यांची ७ दिवसांच्या ईडी कोठडीत रवानगी करण्यात आली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mim chief asadussin owaisi targets ajit pawar ncp on nawab malik arrested by ed pmw
Show comments