सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात एमआयएम पक्षाने चार जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची घोषणा पक्षाचे जिल्हाध्यक्ष हाजी फारूख शाब्दी यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापूर शहर मध्य या प्रतिष्ठेच्या जागेसह अक्कलकोट, सोलापूर दक्षिण आणि सोलापूर शहर उत्तर या चार जागा लढविण्याची भूमिका एमआयएमने घेतली आहे. यापैकी सोलापूर शहर मध्य मतदारसंघात पक्षाने हाजी फारुख शाब्दी यांची उमेदवारी पक्षश्रेष्ठींनी यापूर्वीच जाहीर केली आहे. मागील २०१९ साली याच विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात एमआयएमकडून फारुख शाब्दी यांनी मोठी झुंज दिली होती. त्यावेळी प्रणिती शिंदे यांना ४८ हजार ८३२ मते मिळाली होती. तर द्वितीय स्थानावर राहिलेले शाब्दी यांच्या पारड्यात ३६ हजार ८८९ मते पडली होती. सोलापूर शहर मध्य मतदारसंघ मुस्लिमबहुल मानला जातो. या अगोदरही २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून एमआयएमने या क्रमांकाची मते घेऊन काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना झुंजविले होते.

हेही वाचा >>>Vijay Shivtare : बारामतीत सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक का हरल्या? चार महिन्यांनी विजय शिवतारेंनी नेमकं काय सांगितलं?

यंदा सोलापूर शहर मध्य मतदारसंघाबरोबर मुस्लिम मतदारांवर डोळा ठेवून एमआयएम पक्षाने अक्कलकोट, सोलापूर दक्षिण आणि सोलापूर शहर उत्तर या तिन्ही भाजपच्या ताब्यातील मतदार संघांमध्ये उमेदवार उभा करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार खरोखर उमेदवार दिले गेल्यास त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची आणि ही बाब भाजपसह महायुतीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mim has decided to contest four seats in solapur district in the upcoming assembly elections 2024 amy