कालपर्यंत भाजपा आणि शिवसेना यांच्याभोवतीच आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण फिरत असताना आज अचानक या राजकीय वर्तुळात एमआयएमची एंट्री झाली आहे. एमआयएमकडून राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ‘ऑफर’ देण्यात आल्यानंतर त्यावरून राजकीय दावे-प्रतिदावे केले जात आहेत. एकीकडे भाजपानं यावरून शिवसेनेला टोला लगावला आहे, तर दुसरीकडे संजय राऊतांनी शिवसेनेच्या वतीने ही ऑफर धुडकावून लावली आहे. यासंदर्भात राऊतांनी केलेल्या टीकेवर आता एमआयएमकडून खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिहल्ला केला आहे. एबीपीशी बोलताना इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर देऊन राजकीय वर्तुळात चर्चेची राळ उडवून दिली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी ही ऑफर धुडकावून लावत एमआयएमवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रात तीन पक्षांचेच सरकार आहे आणि तेच राहील. यात चौथा कोण पाचवा कोण यामध्ये तुम्ही कशाला पडला? शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विचारांनी चालणारे पक्ष आहेत. हेच आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या पुढे कबरीपुढे जाऊन गुढघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श आहे ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाही”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”
Uddhav Thackeray News Update News
“महाराष्ट्र दरोडेखोर अन् गुंडांच्या हाती”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सडकून टीका; पक्षचिन्हावरून माजी सरन्यायाधीशांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : “काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं बाळासाहेबांवर अधिक प्रेम आणि..”, संजय राऊत काय म्हणाले?
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

राज्यात नवी समीकरणं जुळणार? एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिली ‘ही’ ऑफर!

“शिवाजी महाराजांचा वापर फक्त राजकीय स्वार्थासाठी”

आता संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना इम्तियाज जलील यांनी पलटवार केला आहे. “भारतात आणि महाराष्ट्रात राहणारा सर्व मुस्लीम समाज शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना आदर्श मानतो. त्यांची मक्तेदारी फक्त तुमची आहे हे विसरून जा. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी करता. औरंगजेब कोणत्या काळात होते आणि आजचा काळ काय आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं”, असं जलील म्हणाले आहेत.

“तुम्ही किती खालच्या पातळीवर गेला आहात हे…”

“ज्या शिवसेनेचा जन्म काँग्रेसच्या विरोधात झाला होता, ती शिवसेना फक्त सत्ता उपभोगण्यासाठी पुन्हा त्यांच्यासोबतच जाऊ शकते, तर तुम्ही किती खालच्या पातळीवर गेला आहात, हे दिसतंय. तुम्ही आम्हाला असा उपदेश देणार असाल, तर लोकांनाही कळालं आहे की छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. आम्ही छत्रपतींच्या नावाचा वापर कधीही आपल्या राजकीय स्वार्थासाठी केलेला नाही”, असं देखील जलील म्हणाले.

“औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे…”; एमआयएमनं दिलेल्या ऑफरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

“भाजपाच्या पराभवासाठी कुणासोबतही जाऊ”

दरम्यान, भाजपाच्या पराभवासाठी एमआयएम कोणत्याही पक्षासोबत युती करायला तयार असल्याचं जलील यांनी यावेळी स्पष्ट केलं. “देशात भाजपा ज्या पद्धतीने वागतेय, त्याचे घातक परिणाम देशात सुरू आहेत. सामान्य लोकांचा रोजगार, महागाईचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणीही काहीही बोलायला तयार नाही. चित्रपट कसा चालू आहे, चित्रपटात काय दाखवण्यात आलं आहे यावर चर्चा सुरू आहे. भाजपाचा पराभव करण्यासाठी आम्हाला कोणत्याही पक्षासोबत जायला लागलं, तरी आम्ही जाऊ”, असं जलील यावेळी म्हणाले.