पक्ष बांधणीअभावी रडतखडत प्रवास

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीसह भाजप, शिवसेना आदी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यात ‘एमआयएम’च्या भू्मिकेकडे काँग्रेससह साऱ्याच पक्षांचे लक्ष वेधले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघात एमआयएमला दुसऱ्या क्रमांकाची ३२ हजारांपेक्षा जास्त मते मिळाली होती. परंतु त्यानंतर या पक्षाची बांधणी अधिक चांगल्या पद्धतीने झाल्याचे दिसून येत नसले तरी आगामी महापालिका निवडणुकीत या पक्षाच्या हालचालीबाबत उत्सुकता वाढली आहे.

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्याक मुस्लिम समाजाची ताकद लक्षणीय आहे. या समाजाच्या ताकदीचा विचार करूनच विधानसभा निवडणुकीच्या ऐनवेळी एमआयएम पक्षाने पाय रोवले होते. पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे माजी नगरसेवरक असलेले आणि आजही ‘बाहुबली’ म्हणून ओळखले जाणारे तौफिक शेख यांना एमआयएमने विधानसभा निवडणुकीत संधी दिली. त्यावेळी खरे तर त्यांची उमेदवारी शिवसेनेचे महेश कोठे यांच्या पथ्यावर पडेल अशी अटकळ बांधण्यात आली होती. कारण त्यावेळी शेख हे महेश कोठे यांचे प्यादे म्हणूनच ओळखले गेले होते. परंतु प्रत्यक्षात शेख यांनी शिवसेनेला मागे टाकून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना झुंजवत द्वितीय क्रमांकांची ३२ हजारापेक्षा जास्त मते घेतली होती. त्यामुळे साहजिकच शेख यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढत गेल्या. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी एमआयएमला रोखण्यासाठी गांभीर्याने पावले उचलली. परिणामी, गेल्या दोन-अडीच वर्षांत या पक्षाची बांधणी होऊ शकली नाही. अलीकडे तौफिक शेख हे एका झोपडपट्टीतील घर व दुकानाची जागा रिकामी करण्यासाठी खंडणी व अपहरणाच्या गुन्ह्य़ात अडकले. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. शेख यांच्या पश्चात पक्ष सांभाळणारा दुसरा कोणी नेता एमआयएमकडे सध्या तरी नाही, अशी स्थिती आहे.

आगामी महापालिका निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावून उतरण्याचे ठरविले आहे.