सांगली : औदुंबर या तीर्थस्थानी मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत मिनी बस जळून खाक होण्याचा प्रकार घडला. नाशिकहून आलेल्या या बसला मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी रोजी रात्री श्री क्षेत्र औदुंबर येथे नाशिकहून आलेली मिनी बस (एम एच ५ ए झेड ५५८३) स्वयंभू गणपती जवळील चिंचेच्या झाडाखाली लावण्यात आली होती. रात्री चालक गाडीमध्ये झोपला असताना अचानक एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान बसच्या पुढील बाजूस आग लागली. क्षणार्धात ही आग वाढत गेली. आग लागल्याची जाणीव होताच चालक जागा झाला व खाली उतरून स्थानिक लोकांना जागे करून, याची माहिती दिली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होईपर्यंत आगीने संपूर्ण बसला वेढले होते.
हेही वाचा – “मंत्रीपदासाठी आता देवाला कौल लावायचाच बाकी राहिलाय”, कोण म्हणतंय जाणून घ्या
गाडीचे पुढील टायर या आगीमध्ये फुटले असून, गाडीतील बैठक व्यवस्था व कागदपत्रेही जळून खाक झाली होती. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर आग ही गाडीतील शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या परिसरामध्ये मिठाई, खेळणी, हॉटेल अशा विविध व्यवसायांच्या टपर्या असून, सुदैवाने यांना कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.