सातारा : महाविकास आघाडी आता फुटण्याच्या अवस्थेत आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात अंतर्गत धुसफूस वाढली आहे. शरद पवार यांच्या राजकीय ऱ्हासाला आता सुरुवात झाली असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी साताऱ्यात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राष्ट्रवादी शरद पवार गटात मागील काही दिवसांपासून अंतर्गत घडामोडी वाढल्या आहेत. काही जणांचा अजित पवारांकडे जाण्याचा कल आहे तर काहीजण त्याला विरोध करत आहेत. त्यातच आ. जितेंद्र आव्हाड व आ. रोहित पवार यांनी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्याकडून शरद पवार गटातील खासदार फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. प्रदेशाध्यक्ष पदावरूनही राष्ट्रवादीत घमासान सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटावर शरसंधान साधले आहे.

हेही वाचा >>> भाजप शत-प्रतिशतकडे; शिर्डीच्या महाविजयी मेळाव्यात दिशादर्शन; शहांची उपस्थिती

या वेळी शेलार म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वीच मी महाविकास आघाडी निवडणुकीनंतर फुटणार असल्याचे सांगितले होते. ही आघाडी केवळ निवडणुकीसाठी एकत्र आलेली होती. निकाल लागल्यानंतर ती फुटणार हे नक्की होते. यानुसारच ‘मविआ’ नावाची गोष्ट आता अस्तित्वात नाही. त्यांची ‘एक्सपायरी डेट’ झाली आहे. सत्तेसाठी एकत्र आलेले आता निवडणुका होताच एकमेकांच्या विरोधात दिसत आहेत. राज्याच्या विकासाचा व मविआचा संबंध नव्हताच. शरद पवार यांच्या गटात अंतर्गत कलहाचे प्रकार घडत आहेत हे नैसर्गिक आहे. या गटाच्या आणि पवारांच्या राजकीय ऱ्हासाला आता सुरुवात झाली असल्याची टीकाही शेलार यांनी केली.