हिंगोली : आमचा मराठय़ांना नव्हे तर झुंडशाहीला विरोध आहे. माझ्या डोक्यावरील केस जेवढे पिकले, त्यापेक्षा जास्त आंदोलने मी केली आहेत, असे सांगत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अप्रत्यक्षरीत्या मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केले. त्यांनी सरकारलाही घरचा आहेर दिला. गावबंदी फलक लावल्यास एक महिन्याची शिक्षा होऊ शकते, असा संविधानात कायदा असून गावागावांमधून राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी करणाऱ्यांना एक महिना तुरुंगात कधी पाठवणार, असा सवाल उपस्थित करून भुजबळ यांनी शिंदे समिती बरखास्त करा, जातगणना करण्यासह दोन महिन्यांत दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणीही केली.

हिंगोली येथील रामलीला मैदानावर आयोजित ओबीसी एल्गार सभेत ते रविवारी येथे बोलत होते. मंचावर भाजपचे विदर्भातील खासदार रामदास तडस, माजी मंत्री महादेव जानकर, प्रकाश शेंडगे, आमदार राजेश राठोड, टी. पी. मुंडे, लक्ष्मण गायकवाड, समीर भुजबळ आदी नेत्यांची उपस्थिती होती. सभेत बोलताना भुजबळ म्हणाले की, मी काही बोललो की महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना वाटते दोन समाजात तेढ निर्माण करतो. तसा आरोप राज्यातील काही नेते मंडळी करतात. मात्र त्यांच्या १५ सभा सभा झाल्यावर, आमची एकच सभा होत आहे, असे भुजबळ म्हणाले.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

हेही वाचा >>>राज्याची केंद्राला साद, दुष्काळ निवारणासाठी २६०० कोटींची मागणी

बीडमधील पुढाऱ्यांच्या घरांची जाळपोळ झाल्याच्या मुद्दय़ावरून भुजबळ म्हणाले, पेटवायला नाही तर पटवायला अक्कल लागते. जाळायला नाही तर जुळवायला अन् मोडायला नाही तर घडवायला अक्कल लागते हे त्यांना कोणीतरी सांगावे? राज्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात जनगणना करा, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सांगतात जनगणना करा, अजित पवार म्हणतात होऊ द्या खर्च, पण जनगणना करा, राहुल गांधी म्हणतात जनगणना करा. अरे करा जनगणना एकदाची. मग दलित आदिवासी आणि ओबीसींची शक्ती किती आहे हे कळेल. बिहार जनगणना करू शकते, महाराष्ट्र का करू शकत नाही? जे होईल ते मान्य करायला तयार आहोत. एकीकडे कुणबी आरक्षण द्या, अशी मागणी होत आहे. दुसरीकडे बाळासाहेब सराटे न्यायालयात गेले. ते ओबीसींचे आरक्षण काढून घेण्याची मागणी करत आहेत, असेही भुजबळ यांनी सांगितले. राज्य सरकारने स्थापन केलेली शिंदे समिती तत्काळ बरखास्त करावी, तसेच दोन महिन्यात जी कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली आहेत, ती रद्द करा, अशी मागणी भुजबळ यांनी केली.

विजय वडेट्टीवारांची पाठ, इतरही नेते अनुपस्थित

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आधीच उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले होते. परंतु आयोजकांकडून वडेट्टीवार येणार असल्याचा दावा करण्यात आला होता. अखेरच्या क्षणी स्वत: वडेट्टीवार यांनी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. परंतु आज प्रत्यक्षात वडेट्टीवारांनी सभेकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले. त्यांना ऐनवेळी तेलंगणातील सभांसाठी निमंत्रित करण्यात आल्यामुळे ते सभेला उपस्थित राहू शकले नसल्याचे सभेच्या मंचावरून सांगण्यात आले. दरम्यान, पंकजा मुंडे, मंत्री संजय राठोड, चंद्रशेखर बावनकुळे, नाना पटोले, जयदत्त क्षीरसागर, विनय कोरे या नेत्यांनीही ओबीसी एल्गार मेळाव्याकडे पाठ फिरवली.

Story img Loader