२ जुलैला महाराष्ट्राच्या राजकारणात चौथ्यांदा मोठी राजकीय उलथापालथ झाली. अजित पवारांसह ९ आमदारांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. बंड करणाऱ्या आमदारांमध्ये धनंजय मुंडे यांचा समावेश आहे. धनंजय मुंडे हे अजित पवारांचे विश्वासू तर देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मित्र समजले जातात.
२०१९ साली अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर घेतलेल्या शपथविधीवेळी धनंजय मुंडे हे सुद्धा असल्याचं सांगितलं जातं. पण, अजित पवार की देवेंद्र फडणवीस यांच्यातील कोणते उपमुख्यमंत्री जवळचे? असा प्रश्न विचारल्यावर धनंजय मुंडे यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. ते ‘मुंबई तक’च्या चावडी या कार्यक्रमात बोलत होते.
हेही वाचा : “आम्ही लायक होतो की नालायक या…”, गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडण्यावर धनंजय मुंडे यांचं भाष्य
“नेमका हा प्रश्न, माझं निट करायला की निट नेटकी करायला विचारला आहे. मी जिथे आहे, व्यवस्थित आहे. आपण आपलं काम करत राहायचं,” असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
हेही वाचा : शरद पवारांचा आधार सोडण्याची वेळ का आली? धनंजय मुंडे म्हणाले, “भाजपा…”
“मला कृषी विभाग दिला आहे. शेतकऱ्यांच्या पोटी आपण जन्माला आलो असून, त्यांचं दु:ख जवळून पाहिलं आहे. मिळालेल्या संधीतून त्यांचं दु:ख कमी करू शकलो, तर ते सर्वात मोठं काम आपल्या हातून घडणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रति कृषी विभागाच्या माध्यमातून कार्य करत राहणे आणि योजना शेवटपर्यंत पोहचवणे, हे माझं काम आहे,” असं धनंजय मुंडे म्हणाले.