बीडच्या धारूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता. त्यावर मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ”गेल्या २० वर्षांपासून मी मतदार संघातील जनतेची सेवा करत आहे. त्याच्यामुळे मी आमदार झालो मंत्री बनू शकलो, एकदा मंत्री झालो म्हणून मी जनतेला कसा विसरेल? मी कायम परळीकरांच्या ऋणात राहू इच्छितो.” असं म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावल्याचे दिसू आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तर, ”माझं जे काही आहे ते तुमच्या समोर आहे. मी राजकारणात आज जशी आहे ते तुमच्या समोर आहे. मी परळीत, बीडमध्ये जनतेची सेवा करते ती गोपीनाथ मुंडे यांच्याच कार्यालयात बसून, मला स्वत:साठी काही नको. माझ्या नावासमोर आमदार नसलं तरी मी माझा वसा टाकलेला नाही. सगळ्या जाती, धर्मांना सोबत घेऊन पुढे जाणाऱ्या नेतृत्वाची आज महाराष्ट्राला गरज आहे. मी मी म्हणणारं नेतृत्व महाराष्ट्राला नकोय, तर जनता-जनता नेतृत्व म्हणणारं हवं आहे.” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.

यावर, ”आम्ही तुमच्यासाठी जे काही करत आहोत ते आमचं कर्तव्य आहे. आम्ही वेगळं काही करत नाही आणि हे मी आयुष्यभर करत राहणार. माझे सगळे सहकारी करत राहणार. मली परळीकरांच्या ऋणातून मला कधीच उतरायचं नाही. मला कायम तुमची सेवा करायची आहे. एकदा तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिलं, मतं दिली आणि मी एकदाच तुमची सेवा केली माझं काम संपलं इथपर्यंत नाही. तर मला तुमच्या कायम ऋणात राहायचं आहे. लॉकडाउनच्या काळात देखील गरिबांना घरपोहच अन्नधान्य देण्याचं काम आपण केलेलं आहे.” असं मंत्री धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवलं.