उद्धव ठाकरे यांनी आमचं ऐकूनच घेतलं नाही त्यामुळेच आम्हाला दुसरा मार्ग पत्करावा लागला अशी खंत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलून दाखवली आहे. तसंच तो आमच्यासाठी दुःखाचा क्षण होता असंही त्यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर हा गुलाबराव काय साधा आहे का? या गुलाबासोबत काटेही आहेत असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. माझ्यावर टीका करणाऱ्यांना टीका करू द्या असंही ते म्हणाले.

हेपण वाचा“किरीट सोमय्या नालायक माणूस, त्याला तुम्ही…”, अरविंद सावंतांची संतप्त प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Pankaja Munde
Uddhav Thackeray: “पंकजाताई मुंडे तुझे धन्यवाद…”, उद्धव ठाकरेंनी केलं कौतुक; म्हणाले, ‘तुम्ही महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
amit thackeray on raj thackeray cried
“…तेव्हा मी राज ठाकरेंच्या डोळ्यात पहिल्यांदा अश्रू बघितले”, अमित ठाकरेंनी सांगितला भावनिक प्रसंग!
raj thackeray latest news
काँग्रेसबरोबर युती करण्यावरून राज ठाकरेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, “मी, माझा स्वार्थ, माझी खुर्ची अन्…”
Raj Thackeray On Ramesh Wanjale
Raj Thackeray : “रमेश वांजळे शेवटचं माझ्याशी बोलले”, राज ठाकरेंनी सांगितली आठवण; म्हणाले, “अनेक जण सोडून गेले, पण…”
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
amit shah slams uddhav thackeray in karad public meeting
बाळासाहेबांनी कमावलेले सर्व उद्धव ठाकरेंनी गमावले; अमित शहा यांचा हल्लाबोल

काय म्हटलं आहे गुलाबराव पाटील यांनी?
आज नवीन वर्ष असल्याने लोक विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवत आहेत. मात्र मी सकाळपासून माझ्या मतदारसंघात फिरतो आहे. नव्या वर्षाच्या निमित्ताने संकल्प हाच केला आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात जे शिवसेनेचं वैभव होतं ते वैभव एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेला पुन्हा मिळवून द्यायचं. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे स्वप्न आहे हर घर जल हर घर नल ते स्वप्नही पूर्ण करायचं आहे. २०२४ मध्ये मला लोक पाणीवाला बाबा म्हणूनच ओळखतील असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले गुलाबराव पाटील?
उद्धव ठाकरेंनी आमचं ऐकलं नाही. आम्हाला नाईलाजाने आमचा पक्ष टिकवण्यासाठी आम्हाला दुसरा मार्ग पत्करावा लागला आणि तो माझ्या आयुष्यातला सर्वात दुःखाचा क्षण होता असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच आपल्यावर जे सातत्याने टीका करतात त्यांनाही उत्तर गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं. जे माझ्या विरोधात बोलत होते त्यांना आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीत उत्तर दिलं आहे. ग्रामपंचायतीची बॉडी निवडून आली. आम्ही सिझनेबल पुढारी नाहीत, पाऊस आला की छत्री उघडली. आमचं दुकान दैनंदिन सुरू आहे. रोज आमची ओपीडी सुरू असते. तिथे हजारो लोकं समस्या घेऊन येतात असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. टीव्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा Chief Ministers Gun Collection: देशातील आठ मुख्यमंत्री बाळगतात शस्त्रे, सर्वात महागड्या बंदुका एकनाथ शिंदेंजवळ

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना गुलाबराव पाटील हे पाणी पुरवठा मंत्री होते. त्यानंतर जेव्हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं शिंदे फडणवीस सरकार आलं या सरकारमध्येही गुलाबराव पाटील यांच्याकडे तेच खातं आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. त्यांनी आमचं काहीही ऐकून घेतलं नाही म्हणूनच आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागला असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

Shinde-Uddhav-1
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे ( संग्रहित छायाचित्र )

२१ जूनला महाराष्ट्रात राजकीय भूकंप, ३० जूनला सत्ताबदल
२१ जूनला म्हणजेच विधान परिषदेची निवडणूक संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी बंड करून थेट सुरत गाठलं. त्यानंतर त्यांना ४० आमदारांची साथ लाभली. शिवसेनेच्या ५६ पैकी ४० आमदार आत्ता शिंदे गटात आहेत. तसंच २९ जूनला महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार हे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने पडलं. महाविकास आघाडीचा प्रयोग होईल असं २०१९ मध्ये कुणालाही वाटलं नव्हतं. तरीही तो झाला. ते सरकार अडीच वर्ष चालल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं त्यामुळे महाराष्ट्रात आणखी एक वेगळाच राजकीय प्रयोग पाहण्यास मिळाला. शिवसेना दुभंगली गेली आणि त्यानंतर शिवसेनेत शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले. शिवसेना आमचीच हा दोन्ही गटांचा वाद निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि नाव दोन्ही गोठवलं गेलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंना मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं तर ढाल तलवार हे चिन्ह मिळालं. या दोन्ही पक्षांमधला संघर्ष रोज पाहण्यास मिळतो आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही तो पाहण्यास मिळाला. मात्र आता गुलाबराव पाटील यांनी आमचं उद्धव ठाकरेंनी काहीही ऐकून घेतलं नाही असं म्हटलं आहे.