दुष्काळग्रस्त लातूरच्या मांजरा नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू असताना काढलेल्या सेल्फीमुळे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. हे सेल्फी सध्या सोशल मिडीयावर फिरत असून विरोधकांनी पंकजा यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. राज्यात भीषण दुष्काळ असताना पंकजा मुंडे फोटोसेशन करण्याची असंवेदनशीलता कशी दाखवतात? असा सवाल विरोधकांकडून विचारण्यात येत आहे. पंकजा यांनीही या टीकेला प्रत्युत्तर देताना जलसंधारणाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे, ही दुष्काळाप्रतीची संवेदना नाही का? असा प्रतिसवाल विरोधकांना विचारला आहे. याशिवाय, पंकजा यांच्याकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. निव्वळ खमंग वार्ता पसरविण्यासाठी काहीजणांनी हा उद्योग केल्याचे पंकजा यांनी निवेदनात म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in