राहाता : आर्थिक स्थितीचे कारण देत राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट नकार दिलेला असताना महायुती सरकारच्या योजना लोकांच्या हितासाठी सुरू केल्या असून,कोणतीही योजना बंद केलेली नाही.शेतकरी कर्जमाफीचा विषय महायुतीच्या जाहीरनाम्यात असल्याने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याबाबत निश्चित विचार होईल असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला.
गुढी पाडवा आणि नव संत्सवराच्या मुहूर्तावर लोणी बुद्रुक येथील श्री मारूती मंदीरात सालाबादप्रमाणे मंत्री विखे यांच्या उपस्थितीत परंपरेने आज रविवारी ग्रामसभा संपन्न झाली.या ग्रामसभेत सर्वानी एकमेकांना शुभेच्छा देवून नव्या विकासाचा संकल्प केला.माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांच्यासह सर्व संस्थांचे पदाधिकारी जेष्ठ नागरीक युवक याप्रसंगी उपस्थित होते.
बैठकीनंतर मंत्री विखे यांनी माध्यमांशी संवाद साधला ,महायुती सरकारने सामान्य माणूस डोळ्या समोर ठेवून योजनांचे निर्णय केले आहेत.प्रत्येक वर्षात योजना यशस्वीपणे राबवणे हे महायुतीचे धोरण असल्याचे सांगून, निवडणुकीत केलेल्या संकल्पाची पूर्तता करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निश्चित होईल. महायुती सरकारने यापुर्वी एक रुपयात पीक विमा योजना,कापूस सोयाबीनला अनुदान,लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत.या योजनांची अनुदान लाभार्थीच्या खात्यात वर्ग झाली आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते मिळत असल्याकडे लक्ष वेधून महायुतीची एकही योजना बंद पडलेली नाही.मात्र काही ठराविक लोकांना पोटशूळ उठला आहे.राज्याच्या जनतेन ज्यांना नाकारल त्यांचीच अधिक उठाठेव सुरू असल्याची बोचरी टिका करून शेतकऱ्यांना कर्जमाफ करण हे महायुतीच्या जाहीरनाम्यात असून त्याची पूर्तता होईल असे सुतोवाच त्यांनी केले. विरोधी पक्षनेता निवडण्यात ज्यांचे एकमत होत नाही त्यांनी महायुतीची उठाठेव करण्यापेक्षा स्वताचे घर आधी बघावे आशी टिका मंत्री विखे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केली. ग्रामस्थांच्या बैठकीत मंत्री विखे आगामी काळातील कार्याची माहीती देतानाच परीसरासह जिल्ह्यातील पाट पाण्याच्या बाबतीत जलसंपदा विभागाने घेतलेल्या धोरणाची माहीती दिली.माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी बैठकीत मार्गदर्शन करून सर्वाना शुभेच्छा दिल्या.