Ministers Bungalows :महाराष्ट्रात महायुतीचं सरकार निवडलं गेलं त्याला आज बरोबर एक महिना पूर्ण झाला. आजचा दिवसही महत्त्वाचा आहे कारण खातेवाटपानंतर आज सगळ्या मंत्र्यांच्या दालनांचं आणि त्यापाठोपाठ बंगल्यांचं वाटपही समोर आलं आहे. विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद अध्यक्ष यांच्यासह कॅबिनेट मंत्र्यांपैकी कुणाला कुठला बंगला मिळाला ते समोर आलं आहे. आत्तापर्यंत ३१ जणांची यादी समोर आली आहे.

आधी दालनांचं वाटप आता बंगल्यांचंही वाटप

मंत्रिमंडळ खातेवाटपानंतर आता मंत्र्‍यांना मंत्रालयातील दालनाचे आणि दालनाच्या पाठोपाठ सरकारी बंगल्यांचेही वाटप करण्यात आलं. त्यामध्ये, विधानपरिषद सभापती राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी हा बंगला देण्यात आला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवगिरी बंगल्याची चावी मिळाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे.

कुणाला कुठला बंगला मिळाला ?

राहुल नार्वेकर – शिवगिरी
राम शिंदे – ज्ञानेश्वरी
चंद्रशेखर बावनकुळे- रामटेक
राधाकृष्ण विखे पाटील- रॉयलस्टोन
पंकजा मुंडे- पर्णकुटी
शंभूराज देसाई-मेघदूत
गणेश नाईक-पवनगड
धनंजय मुंडे-सातपुडा
चंद्रकांत पाटील-सिंहगड
गिरीश महाजन-सेवासदन
मंगलप्रभात लोढा-विजयदुर्ग
अशोक उईके- लोहगड
आशिष शेलार-रत्नशिषु
दत्तात्रय भरणे- सिद्धगड
आदिती तटकरे-प्रतापगड
शिवेंद्रराजे भोसले- पन्हाळगड
मणिकराव कोकाटे-अंबार
जयकुमार गोरे-प्रचितीगड
नरहरी झिरवाळ-सुरुची
संजय सावकारे-अंबर ३२
संजय शिरसाठ-अंबर ३८
प्रताप सरनाईक-अर्वतो ५
भरत गोगावले-सुरुची २
मकरंद पाटील-सुरुची ३
गुलाबराव पाटील-जेतवन

या मंत्र्यांना बंगल्यांच्या चाव्या मिळाल्या आहेत. तसंच आज दालनांचंही वाटप झालं आहे. या दालनांचं वाटप कसं आहे तेही आपण जाणून घेऊ.

कॅबिनेट मंत्री कुणाला कुठली दालनं, कशी आहे विभागणी?

१) चंद्रशेखर बावनकुळे – दालन क्रमांक १०१, १०१ (२), १०१ (ब) १०४ ते १०८ पहिला मजला मंत्रालय विस्तार इमारत

२) राधाकृष्ण विखे पाटील – दालन क्रमांक ५०४, ५०६, ५०८ पाचवा मजला, मंत्रालय विस्तार इमारत

३) हसन मुश्रीफ – दालन क्रमांक २०५ ते २०७, दुसरा मजला मंत्रालय विस्तार इमारत

४) चंद्रकांत पाटील, दालन क्रमांक ३०२ ते ३०७, तिसरा मजला, मंत्रालय विस्तार इमारत

५) गिरीश महाजन, दालन क्रमांक ६०५, ६०७, ६०९, सहावा मजला मंत्रालय विस्तार इमारत

६) गणेश नाईक – दालन क्रमांक ५३६, ५३८, ५४० चौथा मजला मंत्रालय मुख्य इमारत

७) संजय राठोड, दालन क्रमांक १०२, पहिला मजला

८) दादा भुसे, दालन क्रमांक ७००, ७०१, मंत्रालय विस्तार इमारत

९) संजय राठोड, दालन क्रमांक १०२ मध्य बाजू, पहिला मजला मंत्रालय विस्तार इमारत

१०) धनंजय मुंडे, दालन क्रमांक २०१, २०२, २०४, २१२ दुसरा मजला, मंत्रालय विस्तार इमारत

११) मंगलप्रभात लोढा, दालन क्रमांक २०२, मध्य बाजू, दुसरा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

१२) उदय सामंत, दालन क्रमांक १०१, दक्षिण बाजू, पहिला मजला मंत्रालय मुख्य इमारत

१३) जयकुमार रावल, दालन ४०७, चौथा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

१४) पंकजा मुंडे, दालन ४०३, चौथा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

१५) अतुल सावे, दालन ५०१ दक्षिण बाजू, पाचवा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

१६) अशोक उईके, दालन ५०२, मध्य बाजू, पाचवा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

१७) शंभूराज देसाई, दालन ३०२, तिसरा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

१८) आशिष शेलार, दालन ४०१, चौथा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

१९) दत्तात्रय भरणे, दालन ३०१, तिसरा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

२०) आदिती तटकरे, दलान १०३, पहिला मजला, मंत्रालय मुख्य इमारत

२१) शिवेंद्रराजे भोसले, दलान ६०१, ६०२, ६०४ सहावा मजला, मंत्रालय विस्तारित इमारत

२२) माणिकराव कोकाटे, दालन २०३, दुसरा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

२३) जयकुमार गोरे, पोटमाळा, मंत्रालय, मुख्य इमारत

२४) नरहरी झिरवाळ, दालन २०१, दुसरा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

२५) संजय सावकारे, दालन ३०३ तिसरा मजला, मंत्रालय, मुख्य इमारत

२६) संजय शिरसाट, दालन ७०३, ७०४, ७०४ (अ), ७१० सातवा मजला, मंत्रालय विस्तारित इमारत

२७) प्रताप सरनाईक, दलान ३१४, ३१६, ३१८ तिसरा मजला, मंत्रालय विस्तार इमारत

२८) भरत गोगावले, दालन ३१४, ३१६, ३१८

२९) मकरंद जाधव, दालन, ३३६, ३३८ तिसरा मजला

३०) नितेश राणे, पोटमाळा, मंत्रालय दुसरा मजला मुख्य इमारत

३१) आकाश फुंडकर, दालन ११५, ११७, पहिला मजला, मंत्रालय विस्तार इमारत

३२) बाबासाहेब पाटील, दालन ५०१, ५०२, पाचवा मजला, मंत्रालय विस्तार इमारत

३३) प्रकाश आबिटकर, दालन क्रमांक २२७, दुसरा मजला, मंत्रालय विस्तारीत इमारत

राज्यमंत्र्यांपैकी कुणाला कुठली दालनं?

१) आशिष जयस्वाल, दालन ६२६ ते ६२८, सहावा मजला

२) माधुरी मिसाळ, दालन १३८ व १४० पहिला मंत्रालय विस्तार, इमारत

३) पंकज भोयर, दालन २३७ आणि २४१

४) मेघना बोर्डीकर, विधान भवन दालन १२५ व १३०, ए व सी येथी तात्पुरती व्यवस्था

५) इंद्रनील नाईक, विधान भवन दालन १२३ १२४, तात्पुरती व्यवस्था

६) योगेश कदम, विधान भवन, दालन ११७ आणि १२२ तात्पुरती व्यवस्था

Story img Loader