लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या राज्यातील चारही मंत्र्यांचे मंत्रीपद कायम राहणार की, ते स्वत नतिकतेच्या कारणावरून राजीनामा देणार की, केंद्रात सत्तारूढ होत असलेले भाजपच्या नेतृत्वाखालील मोदी सरकार १९७७ चा कित्ता गिरवत काँग्रेस शासित सरकारे आणि तेथील विधानसभा बरखास्त करणार व त्यामुळे मंत्र्यांचे मंत्रीपद जाणार, अशा विविध चच्रेला जोरदार ऊत आला आहे.
गेल्या १९७५ च्या राष्ट्रीय आणीबाणीनंतर काँग्रेसच्या इंदिरा गांधींचे सरकार जाऊन १९७७ मध्ये मोरारजी देसाई यांचे जनता सरकार केंद्रात सत्तारूढ झाले. जनता सरकारने राज्यात सत्तेत असलेल्या सर्व ९ काँग्रेसी सरकारांना व तेथील विधानसभांना बरखास्त करून नव्याने निवडणूका घेतल्या होत्या. आता मोदी सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्यानंतर १९७७ चा ‘जनता’ कित्ता गिरवण्याची धास्ती कांॅग्रेस सत्तेत असलेल्या राज्य सरकारांनी घेतली आहे. महाराष्ट्रातही पृथ्वीराज चव्हाण सरकार यांच्या नेतृत्वाखालील कांॅग्रेस आघाडी सरकार बरखास्त केलेच जाणार नाही, याची खात्री आघाडीलाही वाटत नाही. १९७७ चा कित्ता मोदी सरकारने गिरवला तर चारही मंत्र्यांचे भविष्य मात्र अंधकारमय होणार, हे स्पष्ट आहे.

Story img Loader