लघुशंकेसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये उघडकीस आली आहे. सोमवारी(दि.१४) संध्याकाळी ७ वा. चिकलठाणा औद्योगिक परिसरातील ओसाड मैदानावर अल्पवयीन मुलगी लघुशंकेसाठी गेली असता त्याठिकाणी असलेल्या दोन जणांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून तो एम.सिडको पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

राजू जमधडे (१९)आणि सचिन साबळे(२२) अशी आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. यातील राजू जमधडे याला सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, सचिन साबळे फरार आहे. पिडीत मुलीचे वडील सफाई कामगार असून मुलगी घरी रडत आल्यानंतर हा प्रकार घरच्यांना कळला. बदनामी होईल या भीतीने मुलीच्या पालकांनी मंगळवारी घाबरत याबाबत तक्रार दिली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी आणि एम. सिडको पोलीस पुढील तपास करत आहेत.

Story img Loader