दापोली : दापोली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला एका फार्महाउसमध्ये नेवून तिला शितपेयामधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. तसेच तिचे फोटो काढून ते समाज माध्यमावर टाकण्याची धमकी देत तिच्याशी वारंवार शरिरसंबंध ठेवून तिला मारण्याची धमकी देणाऱ्या एका युवकाविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील एका मुलीला ती अल्पवयीन असताना तिच्याशी समाजमाध्यमाद्वारे ओळख करून घेऊन चिपळूण येथील संशयित अझहर कडवळकर याने मैत्री केली. या मैत्रीमधून तो या मुलीला एप्रिल २०२२ मध्ये चिपळूण येथील एका फार्महाउसवर घेऊन गेला व तेथे तिला शीतपेय पिण्यास दिले. ते या मुलीने प्यायले त्यानंतर या मुलीला गरगरू लागले. त्याचा फायदा घेत या मुलीशी त्याने शरीरसंबंध प्रस्थापित केले व त्याचे फोटोही काढले. त्यानंतर अझहर याने या मुलीला हे फोटो समाजमाध्यमावर टाकेन अशी धमकी देत तिला गुहागर व मुरुड येथील लॉजवर नेवून तिच्याशी अतिप्रसंग केला.

vishal gawli
कल्याण पूर्वेत बालिका अत्याचार हत्येमधील कुटुंबीयांच्या घरासमोर तरुणांची दहशत; “जामीन झाला नाहीतर एके ४७ बंदूक घेऊन येतो…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
There was no competition for post of guardian minister of Satara says Shambhuraj Desai
साताऱ्याच्या पालकमंत्रिपदासाठी स्पर्धा नव्हतीच- शंभूराज देसाई
vasai gangrape marathi news
अश्लील चित्रफितीच्या आधारे धमकावले, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
Vijay Ghaywat, jail, Nagpur, loksatta news,
नागपूर : विकृत विजय घायवटची पुन्हा कारागृहात रवानगी
In Khadakpada area of ​​Kalyan West transgender beaten woman and her little daughter for 20000
कल्याणमधील खडकपाडा येथे तृतीय पंथीयांकडून महिलेला मारहाण
Buldhana, illegal biodiesel, Mumbai squad ,
बुलढाणा : ७१ लाखांचे अवैध बायोडिझेल टँकरसह जप्त! मुंबईच्या पथकाची ‘हाय-वे’वर कारवाई
truth and dare rape news
पिंपरी : रावेतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

आणखी वाचा-Daily Petrol Diesel Price : नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात वाढले पेट्रोल व डिझेलचे दर? तुमच्या शहरांत काय सुरु आहे भाव? जाणून घ्या

समाजमाध्यमावर ओळख झाली तेव्हा अझहर याने वेगळेच नाव सांगितले होते. मात्र या मुलीला त्याचे खरे नाव समजताच तिने त्याच्याबरोबर जाण्यास नकार दिला. तेव्हा अजहर याने लग्न कर असा तगादा लावला. मात्र या मुलीने त्यासाठी नकार दिल्याने त्याने या मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली अखेर या मुलीने दापोली पोलीस ठाण्यात जाऊन अझहर विरोधात तक्रार दाखल केली.

या तक्रारीच्या आधारे संशयित अझहर कडवळकर याचे विरोधात दापोली पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ च्या विविध कलमानुसार तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलीस कोठडी देण्यात आली. याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक ज्योती चव्हाण करत आहेत. या मुलीने तक्रारीत संशयिताचे नाव अझहर कडवळकर असे दिले होते मात्र तपासात ते अझहर कडवईकर असे निष्पन्न झाले असल्याची माहिती तपास अधिकारी यांनी दिली आहे. या घटनेमुळे दापोली तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Story img Loader