वाई:लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर शहरातील कॅफेमध्ये बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कडेगाव(ता वाई) येथील युवकास अटक करण्यात आली आहे. एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून शहरातील कॅफेमध्ये एका वर्षात पाच वेळा बलात्कार केल्याप्रकरणी कडेगाव (ता. वाई) येथील समीर सलीम पटेल (वय २६) यास वाई पोलिसांनी अटक केली आहे.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध एका कॅफेमध्ये संबंधित युवक घेऊन गेला. तिच्यासह अनेक युतींशीही संबंध प्रस्थापित केले. हि बाब त्या मुली पासून लपवून ठेवली. ती दुसऱ्या जातीची आहे असे माहिती असताना सुद्धा या युवकाने एक वर्षात तिच्यावर पाच वेळा अत्याचार केला .पोलीस ठाण्यात समीर पटेल याच्यावर बलात्कार, पोक्सो आणि अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.त्यास पोलिसांनी अटक केली आहे. तपास विभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे – खराडे या करत आहेत. या घटनेमुळे वाई तालुक्यात खळबळ उडाली आहे. वाई शहरासह तालुक्यात सुरु असलेल्या कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कारासारख्या घटना घडू लागल्याने कॅफे बंद करण्यात यावेत अशी मागणी होवू लागली आहे.