अलिबाग– अल्पवयीन मुलीला बोटीवर नेऊन तीच्यावर अत्याचार केल्याची घटना मुरुड तालुक्यात समोर आली आहे. या प्रकरणी २२ वर्षीय तरूणाविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सात वर्षाची ही अल्पवयीन मुलगी तिच्या बहिण भावासह प्रातः विधीसाठी समुद्र किनारी गेली होती. यावेळी आरोपी तेथे आला, तिला फूस लावून बहिण भावांपासून दूर घेऊन गेला. नंतर तिला किनाऱ्यावर लागलेल्या एका बोटीत नेेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
हेही वाचा >>>Ladki Bahin Yojana : “महापालिकेच्या निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होईल”, ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
या घटनेचा मुलीला जबर धक्का बसला. शारीरिक वेदनाही जाणवू लागल्या. त्यामुळे पिडीत मुलीने याबाबतची माहीती तिच्या आईला दिली. आईने तात्काळ पोलीस ठाणे गाठून या संदर्भातील तक्रार नोंदवली.
या मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी आर्यन दिपक कोटकर विरोधात भारतीय न्याय संहीता आणि पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक एम टी शिंदे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
© The Indian Express (P) Ltd