मीरा-भाईंदर महापालिकेचे अंदाजपत्रक सादर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणतीही करवाढ न लादलेले परंतु उत्पन्नवाढीवर आणि पायाभूत सुविधांवर भर देणारे १५६८ कोटी रुपयांचे मीरा-भाईंदर महापालिकेचे अंदाजपत्रक शुक्रवारी स्थायी समिती समोर सादर करण्यात आले. या अंदाजपत्रकानुसार आगामी वर्षांत एकंदर १५६७ कोटी ९९ लक्ष रुपयांचा खर्च केला जाणार असून वर्षअखेरीस पाच लाख रुपये शिल्लक राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

महापालिकेचे आयुक्त बालाजी खतगांवकर यांनी स्थायी समितीचे सभापती अ‍ॅड्. रवी व्यास यांना २०१९- २०चे १५६८ कोटी ४ लाख रुपयांचे मूळ अंदाजपत्रक सुपूर्द केले. गेल्या वर्षांच्याअंदाजपत्रकात यंदा ३५० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीचे अंदाजपत्रक १२१३ कोटी रुपयांचे होते. यंदा शासकीय अनुदानांमुळे अंदाजपत्रकात वाढ झालेली दिसून येत आहे.

महिलांसाठी विशेष भवन

याव्यतिरिक्त महिलांसाठी विशेष महिला भवनची यंदा उभारणी केली जाणार आहे. यात महिला बालकल्याण विभागाचे कार्यालय, महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र, सभागृह आदी सुविधा असणार आहेत. बुद्धविहार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठीही अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर शहरातच प्रक्रिया करणारे आठ प्रकल्प महापालिका उभारणार आहे. या प्रकल्पांसाठी ३१ कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महापालिकेच्या उत्पन्नावर विकासकामे अवलंबून असल्याने यंदाच्या अर्थसंकल्पात उत्पन्नवाढीवर विशेष भर देण्यात आला आहे, तसेच नागरिकांना द्यायचे रस्ते, पाणीयोजना या पायाभूत सुविधांसह मैदाने, उद्याने आदी विकासकामे, सध्या सुरू असलेल्या विकास योजनांना गती देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

-बालाजी खतगांवकर, आयुक्त

प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर २१ आणि २२ फेब्रुवारीला स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. यावेळी सर्वसामान्यांसाठी आवश्यक असलेल्या योजना तसेच उपलब्ध निधी विकासकामांवर योग्य पद्धतीने खर्च होईल याची दक्षता घेण्यात येणार आहे.

-अ‍ॅड रवी व्यास. स्थायी समिती सभापती.