मिरजगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे हमालीच्या दरावरून हमाल माथाडी कामगारांनी कामकाजावर टाकलेल्या बहिष्कारामुळे दोन दिवस या उपबाजार समितीचे काम ठप्प होते. त्यामुळे शेतकरी व व्यापारी यांचे आर्थिक नुकसान झाले.
व्यापारी व हमाल माथाडी कामगार यांच्यामध्ये हमालीच्या दरामधून निर्माण झालेला हा तिढा सोडविण्यासाठी बाजार समितीचे चेअरमन काकासाहेब तापकीर, संचालक व एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बापूसाहेब नेटके मेजर यांनी पुढाकार घेतला आणि हा प्रश्न सोडवला. त्यामुळे बाजार समितीचे कामकाज पुन्हा सुरळीत सुरू झाले आहे. यावेळी बाजार समितीचे संचालक लहू वतारे, गुलाब तनपुरे, विजय भंडारी व नंदकुमार नवले यांनीदेखील महत्त्वाची भूमिका यावेळी पार पाडली.
यावेळी हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष संजय कोल्हे, उपाध्यक्ष नामदेव खेडकर ,संग्राम घोडके, प्रकाश शेलार, विकास टकले, पप्पू कोरे, किरण सातव, विवेक धाकड, दत्तू खेडकर, भरत सकट, साहेबराव राऊत, प्रदीप तनपुरे, श्री गायकवाड मामा, किशोर गोरे, दीपक बारंगुळे, सचिन मुरकुटे, भाऊ झांबरे, संजय चेडे, किरण राऊत, बाबा मते, बाजार समितीतील अडते व्यापारी अशोक सुपेकर, मुन्ना भंडारी, रोहन भंडारी, चैनसुखलाल पितळे यांच्यासह सर्व व्यापारी बांधव उपस्थित होते.
मिरजगाव बाजार समितीमध्ये माथाडी कामगार यांना देण्यात येणाऱ्या हमालीच्या दरावरून संघर्ष निर्माण झाला होता. बाजार समितीचे व्यवहार दोन दिवसांपासून बंद होता. माथाडी कामगार यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बापूसाहेब नेटके मेजर यांनी पुढाकार घेतला आणि कामगार व व्यापारी यांच्यात समन्वय घडून आणला.
हमालीच्या दरवाढीसाठी आंदोलन
हमाल माथाडी कामगारांनी पूर्वीचा केलेल्या कराराची मुदत संपल्यामुळे या वर्षीपासून नवीन दर लागू करावेत, अशी मागणी केली होती. मात्र, आडते व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही म्हणून अखेर कामगारांनी कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. माथाडी कामगारांनी बहिष्कार टाकल्यामुळे बाजार समितीचे कामकाज दोन दिवसांपासून बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय झाली होती. या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये नवीन दराचा तिढा सोडवण्यात आला. कामगार व व्यापारी या दोघांनीही बाजार समितीने ठरवलेले नवीन दर मान्य केले. १ जानेवारी २०२५ पासून हे नवीन दर लागू धरण्यात आले आहेत. आता कोणतीही अडचण राहिलेली नाही. मिरजगाव बाजार समितीचा सर्व खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू झाला आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन काकासाहेब तापकीर व संचालक बापूसाहेब नेटके यांनी दिली.