कोल्हापूर जिल्हा परिषदेने ‘एक पाऊल स्वच्छतेकडे’ या ब्रीदवाक्याचा अंगिकार करत मिशन स्वच्छता अभियानात लक्षणीय काम केले आहे. आधीच सधन, समृद्ध असलेला आणि निसर्गसौंदर्याने नटलेला, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर विविध पारितोषिके पटकावलेली कोल्हापूर जिल्हा परिषद स्वच्छता अभियानातही चमकदार कामगिरी करेल, अशी खात्री या विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबविण्याचे आवाहन केले होते. या अभियानाला कोल्हापूर जिल्हा परिषदेने गतवर्षीपासून लक्ष घातले आहे. २ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद गांधीजींच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी झटत आहे. सन २०१५-१६  या आíथक वर्षांमध्ये संपूर्ण जिल्हा निर्मल करणे हा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला असून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्राम स्वच्छतेसाठी राजर्षी शाहू ग्राम स्वच्छता अभियान जिल्ह्यात राबविण्यावर सुभेदार यांचा विशेष भर आहे.
      जिल्हा परिषदेच्या ३०३९ कर्मचाऱ्यांनी पहिल्या शनिवारी कार्यालयाअंतर्गत स्वच्छतेसाठी १६३ तास श्रमदान केले आहे. यामध्ये त्यांनी ८३३ खोल्या, १३६८ कपाटे आणि १९९९ टेबल स्वच्छ केली आहेत. हे एकूण १८९९९८ चौरस वर्ग क्षेत्र आहे. ६  बंडलमध्ये दप्तर लावून घेतले आहे. तसेच श्रमदानाच्या दिवशी अभिलेख्यांचे वर्गीकरण केले आहे. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी ३७८२ कर्मचाऱ्यांनी कार्यालय परिसर स्वच्छता केली आहे. १६३ तास श्रमदान करून ११ डंपर, ५१ ट्रक्टर ट्रॉली आणि ८३  घंटागाडीच्या मदतीने १२.६३ हेक्टर क्षेत्र स्वच्छ केले आहे. पंचायत समित्यांसह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात स्वच्छता मोहीम धडाक्यात सुरू आहे.
      निर्मल ग्राम पुरस्कार योजनेतही कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आहे. राज्यातील या ९५२३ ग्रामपंचायतीतील १००२ ग्रामपंचायती एकटय़ा कोल्हापूर जिल्ह्यातील असून हे जिल्हा परिषदेसाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले जाते. जिल्ह्यातील ६ तालुके पूर्णपणे निर्मल आहेत. जिल्हा परिषदेने पंचगंगा नदी प्रदूषण निर्मूलनाचा उपक्रमही हाती घेतला आहे. नदी प्रदूषित होणारी जिल्ह्यात २४ गावे आहेत. जिल्हा परिषदेने संबंधित ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावामधील सांडपाणी, घनकचरा नदीमध्ये मिसळून नदी प्रदूषित होऊ नये, म्हणून प्राथमिक स्वरूपाच्या उपाययोजना अवलंबिल्या आहेत.
… तरीही गावोगावी अस्वच्छताच
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयापासून ते गावोगावी स्वच्छता अभियान झोकात पार पडल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी वस्तुस्थिती मात्र निराळीच आहे. जिल्ह्यातील आणि शहरसदृश खेडय़ांसह अनेक ग्रामपंचायती वाडय़ा वस्त्या येथे कमालीची अस्वच्छता आहे.

Story img Loader