कॉम्रेड पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ कम्युनिस्ट पक्षासह सर्व डाव्या नेत्यांनी आज महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. डाव्या नेत्यांच्या या आवाहनाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आरपीआयनेही पाठिंबा दर्शवला आहे. तर राज्यभरातून या बंदाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी बंदला पाठिंबा देणार असल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले. शेतकरी संघटना आणि रिपाइंनेही या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच कोल्हापूर शहरातील सर्व स्तरातील संघटनांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. कॉ. पानसरेंवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात निषेध रॅलीच आयोजन करण्यात आले. नागपूरच्या महात्मा गांधी चौकात साहित्यिक, कामगार नेते आणि डाव्या संघटनेच्या पदाधिका-यांनी कॉ. पानसरेंच्या हत्येविरोधात निदर्शने केली.

Story img Loader