MLA Abhimanyu Pawar Beed Akrosh Morcha : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमागे वाल्मिक कराड हा मुख्य सुत्रधार आहे. पोलीस या प्रकरणात दिशाभूल करत आहेत. अशी मागणी परळी, बीडसह संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे. अनेक आमदारांनी व इतर लोकप्रतिनिधिंनी ही मागणी लावून धरली आहे. अशातच आज बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी मूक मोर्चा काढला. त्यानंतर काही प्रमुख नेत्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी लातूरमधील औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार म्हणाले, “मी येथे संतोष देशमुख यांना लातूरच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलो आहे. तसेच मला बीडमधील जनतेला सांगायचं आहे की लातूरमधील सर्व जनता आणि मी तुमच्याबरोबर आहे. संतोष देशमुख यांच्यासाठी आम्ही विधानसभेत आवाज उठवला आहे. विधान भवनाबाहेर देखील आम्ही आमचा आवाज बुलंद केला आहे. आता आम्ही रस्त्यावर देखील उतरलो आहोत. तुम्ही काहीही काळजी करू नका. आम्ही तुमच्याबरोबर आहोत”.

आमदार अभिमन्यू पवार म्हणाले, “ज्या पद्धतीने त्या लोकांनी संतोष देशमुख यांना मारलं, महाराष्ट्राच्या इतिहासात इतकी क्रूरता आजपर्यंत कधीच ऐकायला, वाचायला मिळाली नव्हती. या प्रकरणातील आरोपींना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हे सांगायलाच मी इथे आलो आहे. येथे जो आक्रोश आपण पाहत आहोत तो फक्त बीडचा नाही, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जनतेचा आहे. मी सरकारमध्ये असलो तरी सरकारला सांगू इच्छितो की या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक झाली नाही तर हा आक्रोश बीडपुरता मर्यादित राहणार नाही, लातूर, धाराशिव, जालन्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल. ज्या प्रकारे कोपर्डीच्या प्रकरणानंतर राज्यभर निघालेले मोर्चे महाराष्ट्राने पाहिले तसेच मोर्चे आता देखील महाराष्ट्रभर निघतील, कारण आम्हाला संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आहे. त्यासाठीच मी लातूर वरून या आक्रोश मूक मोर्चात सहभागी होण्यासाठी आलो आहे”.

Ajit Pawar shares Memory of Manmohan Singh
“…अन् गोपीनाथ मुंडेंना काँग्रेस प्रवेश करता आला नाही”, अजित पवारांनी सांगितला मनमोहन सिंगांच्या मोठेपणाचा किस्सा
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Ravindra Chavan
मंत्रिमंडळातून डच्चू दिलेल्या रवींद्र चव्हाणांना भाजपाकडून मोठी जबाबदारी, पक्षाकडून पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर
prajakta mali on suresh dhas (1)
Prajakta Mali: प्राजक्ता माळीनं सुरेश धसांबाबत मांडली सडेतोड भूमिका; “ज्या कुत्सितपणे विधान केलंत, तेवढ्याच विनम्रपणे माफी मागा”!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”

हे ही वाचा >> प्रकाश आंबेडकरांनी घेतली फडणवीसांची भेट, दोघांमध्ये तासभर चर्चा, कोणत्या मागण्या मान्य केल्या?

आमदार अभिमन्यू पवार यांचा सरकारला इशारा

औस्याचे आमदार म्हणाले, “इथे मंचावर आलेली मंडळी कोणत्याही पक्षाची, जातीची अथवा धर्माची नाही, हा पीडित जनतेचा आवाज आहे. मी देशमुख कुटुंबाला आश्वस्त करू इच्छितो की आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी आहोत. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे की या प्रकरणातील आरोपांनी कठोरात कठोर शासन व्हायला हवं. मला खात्री आहे की लवकरात लवकर मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या जातील. या प्रकरणातील आरोपी कोणीही, कितीही मोठे असले, वाल्मिक कराडसारखा व्यक्ती असला तरी सर्वांना अटक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि जर या प्रकरणातील आरोपींना अटक झाली नाही तर असाच एक मोर्चा लातूरलाही आम्ही काढू. सरकारने आमच्या या मोर्चाची दखल घ्यावी, एवढीच माझी विनंती आहे”.

Story img Loader