Ashok Pawar: राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. विविध मतदारसंघात नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. प्रचार सभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण तापलं आहे. असे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शिरूर मतदारसंघाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करुन मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात अशोक पवार यांच्याकडून शिरुर पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत अॅड.असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेत या घटनेची माहिती दिली आहे. तसेच अॅड.असीम सरोदे यांनी पत्रकारांशी बोलताना ऋषीराज पवारची एक व्हिडीओ क्लीप दाखवली आहे. त्यामध्ये अपहरण कशा प्रकारे झाले आणि अपहरण झाल्यानंतर आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप व्हिडीओ क्लीपमध्ये ऋषीराज पवार याने केला आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Sharad Pawar On Dhananjay Munde
Sharad Pawar : “राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांमध्ये तीन लोक प्रामुख्याने होते”, शरद पवारांचा रोख कुणाकडे? चर्चांना उधाण
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

हेही वाचा : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य

अॅड.असीम सरोदे यांनी काय म्हटलं?

“तो मुलगा घाबरून गेला होता की एवढे पैसे कुठून आणणार? मग त्या मुलाने थोडसं प्रसंगावधान दाखवलं आणि मी बाहेर गेल्यानंतर काही पैसे देऊ शकतो. मी माझे प्रचार करणारे काही लोक आहेत, त्यांना भेटून तुम्हाला काही पैसे देऊ शकतो. मात्र, एवढे पैसे तुम्हाला देऊ शकत नाही. त्यामुळे त्या मुलाला त्यांनी बाहेर सोडलं आणि सांगितलं की, तू जर पैसे दिले नाही तर आम्ही हा व्हिडीओ व्हायरल करू. मग तू याची कल्पना करु शकतो. यानंतर तो मुलगा बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणाहून निघून जाण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी त्याला व्हिडीओ दाखवण्यात येत होता, त्यावेळी याने त्या मोबाईलचाही व्हिडीओ पटकन काढून घेतला. तो व्हिडीओ कोणाला तरी पाठवण्यात आल्याचं लक्षात येत आहे. यासंदर्भात ऋषीराज पवार हा गुन्हा दाखल करण्यासाठी शिरून पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. मात्र, गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलीस विलंब लावत आहेत”, असा आरोप वकील असीम सरोदे यांनी माध्यमांशी बोलताना केला.

दरम्यान, टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीवर दाखवण्यात आलेल्या व्हिडीओ क्लीपमध्ये ऋषीराज पवार असं सांगत आहे की, “एकजण असं म्हटला की जेवणाच्या आधी आपण तिकडे जाऊन येऊ. मिटिंग करू. तो व्यक्ती माझ्याबरोबर प्रचारात देखील फिरला. त्यामुळे त्याच्यावर मी विश्वास ठेवून आम्ही दोघं माझ्या गाडीत बसलो. माझ्या गाडीच्या चालकाने ती गाडी मांडवगण वडगाव रोडला एका ठिकाणापर्यंत नेली. तेथून पुढे चारचाकी गाडी जाणार नाही, असं मला त्या व्यक्तीने सांगितलं. त्या ठिकाणी आधीच दोन दुचाकी बोलवून घेतल्या होत्या. त्या व्यक्तीबरोबर अजून दोनजण सहभागी होते. त्यानंतर आम्ही त्या दुचाकीवर बसलो. पुढे या दोन्ही दुचाकी एका बंगल्यापर्यंत गेल्या. मला त्या ठिकाणी आतमध्ये नेलं आणि बसवलं. मग मला ते म्हटले की दुसऱ्या रुममध्ये या काहीतरी बोलायचं आहे. त्या रूमध्ये गेल्यानंतर एकजण भाऊ कोळपे नामक व्यक्ती आणि आणखी दोघेजण रूमध्ये शिरले. त्या ठिकाणी रुमचा दरवाजा बंद केला आणि माझे हातपाय बांधले. तेव्हा मी त्यांना म्हटलं की हे का करताय? तुम्हाला पैसेच हवे असतील तर सांगा आपण काहीतरही करू. त्यानंतर त्यांनी माझा गळा दाबला आणि मारहाण करत मारून टाकण्याचा प्रयत्न केला. मग ते म्हणाले की आम्हाला १० कोटींची ऑफर आहे. त्यानंतर त्यांनी मला विवस्त्र केलं आणि महिलेला आणून व्हिडीओ काढले”, असा आरोप ऋषीराज पवार याने त्या व्हिडीओ क्लीपमध्ये केला आहे.

Story img Loader