राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवारांच्या बंडखोरीमुळे पक्षात दोन गट पडले आहेत. अजित पवारांच्या गटाने आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं सांगत थेट पक्षावर दावा केला आहे. तसेच हा गट भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटाबरोबर सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे. तसेच अजित पवारांच्या गटातील इतर आठ आमदार मंत्री झाले आहेत. दुसऱ्या बाजूला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटात मोजकेच आमदार आहेत. अशातच गेल्या काही दिवसात शरद पवार यांच्या गटातील काही आमदारांनी अजित पवारांच्या गटाला समर्थन दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाली तेव्हा कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे कुटुंबाबरोबर परदेशात गेले होते. परदेशातून परतल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या गटाला समर्थन दिलं आहे. आशुतोष काळे म्हणाले, त्यांना अजित पवार गटाकडून आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा तिकीट दिलं जाणार आहे.

आमदार आशुतोष काळे म्हणाले, हे घडलं (पक्षात दोन गट पडले) तेव्हा मी परदेशात होतो. मी परतल्यानंतर अजित पवार, शरद पवार तसेच इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक परिवार म्हणून काम करतो. त्यामुळे या सगळ्या घडामोडी घडल्या तेव्हा सगळेच जण द्विधा मनःस्थितीत होते. एका बाजूला शरद पवार आहेत, तर दुसऱ्या बाजूला अजित पवार आहेत.

आमदार काळे म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत आपले विचार आपण सोडायचे नाहीत, असं शरद पवार म्हणाले आहेत. परंतु आम्ही सत्तेत असताना आम्हाला जेवढी कामं करता आली तेवढी कामं विरोधी पक्षात असल्यावर मार्गी लागत नव्हती. कोपरगावातील मतदारांनी जी संधी दिली आहेत, त्यानंतर आता त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत, त्यांची जास्तीत जास्त कामं मार्गी लावण्यासाठी मी अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांचीही भेट झाली.

हे ही वाचा >> “कोणाला किती दिवस बरोबर ठेवायचं आणि…”, भाजपा आमदाराचं मोठं वक्तव्य…

आमदार आशुतोष काळे म्हणाले, आपण जरी आत्ता विचार करतोय की पक्षात दोन गट पडले आहेत. एक अजित पवारांचा गट, एक शरद पवारांचा गट. परंतु भविष्यात आम्ही एकसंघ पद्धतीने आणि एका विचाराने एकत्र काम करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मी छोटा कार्यकर्ता असलो तरी त्यात माझी मदत करता आली तर मी ती करेन.