दहशतवादी याकूब मेमनच्या फाशीला पत्र लिहून विरोध दर्शवणारा आमदार उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात आहे ही बाब त्या पत्रावरुनच समोर आली आहे. या आमदारांचं नाव आहे काँग्रेस आमदार अस्लम शेख. काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी आज महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र २८ जुलै २०१५ रोजी हेच आमदार अस्लम शेख यांनी राष्ट्रपती महोदयांना याकूब मेमनला फाशी देऊ नये यासंदर्भातले पत्र लिहिले होते. याकूब मेमनला फाशी न देता त्याला जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी आमदार अस्लम शेख यांनी २०१५ मध्ये केली होती. याकूब मेमननेही राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. या अर्जाला पाठिंबा देणारं पत्र अस्लम शेख यांनी राष्ट्रपतींना लिहिलं होतं ही बाब आता समोर आली आहे.
२०१५ मध्ये याकूब मेमनच्या समर्थनार्थ राष्ट्रपतींना अस्लम शेख यांनी पाठवलेलं पत्र
कोण आहेत अस्लम शेख?
१९९९ ते २००४ या कालावाधीत अस्लम शेख हे दरम्यान समाजवादी पक्षात होती.
२००४ ते २००९ या कालावधीत ते काँग्रेसमध्ये आले
२०१४ मध्ये त्यांनी राम बोराट यांचा पराभव केला
२०१९ मध्ये रमेश सिंह ठाकूर यांचा पराभव त्यांनी केला
अस्लम शेख यांनी आज कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली
कोण होता याकूब मेमन?
१९९३ मध्ये मुंबईत झालेल्य साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणातील मुख्य दोषींपैकी याकूब मेमन एक होता.
३० जुलै २०१५ रोजी याकूब मेमनला फाशी देण्यात आली
१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटाचं प्रकरण कोर्टात १५ वर्षे सुरु होतं, ज्यावर निकाल देताना १२ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, ज्यापैकी एक याकूबही होता
कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार, ९३ च्या स्फोटांचे मुख्य सूत्रधार हे दाऊद इब्राहिम, टायगर मेमन आणि याकूब मेमन हे तिघे होते
याकूब मेमन हा व्यवसायाने CA होता, दाऊद आणि टायगर मेमन यांचे आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याचाही आरोप त्याच्यावर होता.