सोलापूर : मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे पक्षाच्या पातळीवर राज्यातील लोकसभा मतदारसंघांच्या आढावा बैठका घेत असताना माढा लोकसभा आढावा बैठकीस पक्षाचे माढ्याचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू तथा करमाळ्याचे अपक्ष.आमदार संजय शिंदे हे दोघेही गैरहजर राहिले. एवढेच नव्हे तर पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनीही या आढावा बैठकीकडे पाठ फिरविली. त्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पक्षीय स्तरावर लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक झाली. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह आजी-माजी खासदार, आजी-माजी आमदार, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शरद पवार यांनी माढा, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, धाराशिव, बीड, परभणी, नाशिक, हिंगोली आदी लोकसभा मतदारसंघांचा पक्षीय आढावा घेण्यात आला. परंतु यात माढा लोकसभा आढावा बैठक सुरू झाली असता माढ्याचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू, करमाळ्याचे राष्ट्रवादी सहयोगी सदस्य अपक्ष आमदार संजय शिंदे या दोघांची अनुपस्थिती जाणवली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हेसुध्दा गैरहजर राहिले. मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील-अनगरकर, माजी आमदार दीपक साळुंखे, पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील आदींनी या बैठकीत हजेरी लावून माढा लोकसभा जागेसंबंधीची माहिती पुरविली. मात्र मोहोळ मतदारसंघाचा भाग माढ्याऐवजी सोलापूर लोकसभा मतदारसंघाशी संबंधित आहे.

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Image of Uttam Jankar
Ajit Pawar : “…तर मी अजित दादांबरोबर जाईन”, शरद पवार यांच्या आमदाराचे मोठे विधान
Eknath Shinde
चार मंत्री असलेल्या साताऱ्यात पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणाची वर्णी लागणार? शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका स्पष्ट, म्हणाले…
Will Deputy Chief Minister Eknath Shinde succeed in retaining post of Guardian Minister of Thane
अजित पवारांचा कित्ता एकनाथ शिंदे गिरवणार का?
Eknath Shinde
नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंकडून श्रद्धा अन् सबुरीचा सल्ला; म्हणाले, “दुसऱ्या टप्प्यात…”
devendra fadanvis
महायुतीच्या आमदारांची रेशीमबागेतील स्मृती मंदिराला भेट
Neelam gorhe statement about ram shinde in Legislative Council hall is viral
नीलम गोऱ्हे राम शिंदेंना म्हणाल्या, “आता तुम्हाला मागच्या दाराने….”

माढ्याचे आमदार बबनराव शिंदे व करमाळ्याचे अपक्ष.आमदार असलेले त्यांचे बंधू संजय शिंदे यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी आपल्या निकटच्या नातेवाईकाचा विवाह सोहळा असल्यामुळे आपण पक्षाच्या लोकसभा आढावा बैठकीस उपस्थित राहू शकलो नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. आमदार शिंदे बंधुंशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Story img Loader