Bachchu Kadu On BJP Congress : विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. सर्वच नेत्यांच्या सध्या राज्यभरात ठिकठिकाणी सभा, मेळावे आणि आढावा बैठका सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. त्यातच राज्यात तिसऱ्या आघाडीचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तिसऱ्या आघाडीमध्ये संभाजीराजे छत्रपती, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू यांच्यासह आदी काही नेत्यांचा सहभाग असल्याची शक्यता आहे.

तिसऱ्या आघाडीच्या संदर्भात बैठकांचा धडाकाही सुरु आहे. खरं तर राज्यातील महायुती सरकारला प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी पांठिबा दिलेला आहे. असे असतानाच आता बच्चू कडू यांनी काँग्रेस (Congress) आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाला (BJP) इशारा दिला आहे. “काँग्रेस आणि भाजपाने लुटणारी व्यवस्था निर्माण केली. त्या भाजपा आणि काँग्रेसला उखडून फेकण्याचे दिवस आले आहेत”, असं विधान आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी एका सभेत बोलताना केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
19th rashibhavishya in marathi
१९ सप्टेंबर पंचांग: वृद्धी योग राशीच्या कुंडलीत बदल…
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat : महाविकास आघाडीत मतभेद? मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेसचा…”
jayant patil appeal bachchu kadu
Jayant Patil : राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु असतानाच जयंत पाटलांचे बच्चू कडूंना आवाहन; म्हणाले…
Hasan Mushrif on Sharad pawar
Hasan Mushrif on Sharad Pawar: “पवार साहेब तुमच्याशी वैर नाही, समरजित आता तुझी…”, हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर
Ajit Doval
Ajit Doval : अमेरिकेतील न्यायालयाचं भारत सरकार व अजित डोवालांना समन्स, नेमकं प्रकरण काय?
Delhi-Mumbai Expressway Road caved
पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेला मुंबई-दिल्ली महामार्ग उंदरामुळे खचला, अजब दावा करणाऱ्या कर्मचाऱ्याची हकालपट्टी
Ajit Pawar Amol Kolhe
Amol Kolhe : अजित पवार म्हणाले, “आता आपणच साहेब”, अमोल कोल्हे प्रत्युत्तर देत म्हणाले, “राज्यात दोनच साहेब, एक शरद पवार, दुसरे…”

हेही वाचा : Jayant Patil : राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु असतानाच जयंत पाटलांचे बच्चू कडूंना आवाहन; म्हणाले…

बच्चू कडू काय म्हणाले?

“शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची लढाई गेल्या ७५ वर्षांपासून आपण लढतो आहोत. अजूनही शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या पोरांना मानसन्मान भेटत नाही. शेतकऱ्यांना अजून आत्महत्या करण्याची वेळ येते. त्यामुळे आता ही बदल्याची भावना निर्माण होत आहे. आता येणारी ही निवडणूक बदला घेणारी असेल. ज्यांनी-ज्यांनी धर्म आणि जात सांगून आमचे मत घेतले त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहायचं नाही. कांद्यामुळे आम्हाला ज्यांनी ज्यांनी रडवलं मग काँग्रेस असूद्या अन्यथा भारतीय जनता पक्ष. गेल्या ७५ वर्षात भाजपा आणि काँग्रेसने दोन्ही पक्षांनी राज्य केलं. दोघांनीही आमच्या डोळ्यात पाणी काढलं. शेतकरी रात्रींचा दिवस आणि दिवसाची रात्र करतो, मेहनत करतो, कष्ट करतो. ज्या शेतीमधून शेतकरी पीक घेतो, ऊन, वारा, पाऊस कशाचीही परवा न करता आमचा शेतकरी कष्ट करतो. मात्र, काँग्रेस आणि भाजपाने लुटणारी व्यवस्था निर्माण केली. त्या भाजपा आणि काँग्रेसला उखडून फेकण्याचे दिवस आले आहेत”, असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. दरम्यान, याचवेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून महायुती सरकारवर हल्लाबोल केला.