महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी रविवारी दुपारी शपथ घेतली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे आपल्याच बरोबर आहे असंही त्यांनी सांगितलं. अजित पवारच नाही तर छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे यांसह नऊ दिग्गजांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी खोके सरकार असं म्हणून आम्हाला जे डिवचत होते ते आता ओके झाले आहेत असं म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे बच्चू कडूंनी?

“अजित पवार यांच्या शपथविधीच्या घटनेने असं लक्षात आलं की देवेंद्र फडणवीस यांचं उत्तम नियोजन आणि एकनाथ शिंदे यांचा विकास याचं गारुडच अजित पवारांवर पडलेलं दिसतं आहे. अजित पवार हे या सरकारच्या प्रेमातच पडले. त्यामुळे अजित सत्तेपेक्षा विकास वेगाने करणं हे जास्त महत्त्वाचं वाटलं. अजित पवार आणि सगळ्यांचंच स्वागत आहे. काल आणि परवा पर्यंत खोके म्हणणारे ओके होऊन आमच्या सरकारमध्ये आले आहेत. चला जे झालं ते चांगलं झालं” असं म्हणत बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
uddhav Thackeray sawantwadi
“कोकण आणि शिवसेनेचे नाते तोडण्याचा प्रयत्न, कोकणचे अदानीकरण होऊ देणार नाही”, उद्धव ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray Speech in Ausa Latur
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची खोचक शब्दांत टीका, “महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत, कारण..”
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”

अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीला धक्का

अजित पवारांनी केलेल्या बंडखोरीमुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई मी रस्त्यावर उतरून लढतो आहे. जे काही झालं ते नवीन नाही, मी असल्या गोष्टींना सरावलो आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. कऱ्हाड या ठिकाणी जाऊन त्यांनी प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि पक्ष नव्याने बांधण्याची त्यांनी सुरुवात केली. तसंच अजित पवारांनी जरी पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगितला असला तरीही मी निवडणूक आयोगाकडे आणि न्याय मागायला कुणाकडे जाणार नाही. मी लोकांना भेटणार कारण त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांनी महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुका या भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढवणार असल्याचंही जाहीर केलं आहे. त्यांनी केलेल्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप किती आमदारांचं पाठबळ हे अजित पवारांकडे आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. शिंदे सरकार जेव्हा स्थापन झालं त्यानंतर काही दिवसातच ५० खोके एकदम ओके ही घोषणा शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आली. ही घोषणा राष्ट्रवादीचेही लोक देत होते. बच्चू कडू यांनी आता याच मुद्द्यावर राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.