सावंतवाडी : प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी माजी मंत्री, आमदार भास्कर जाधव यांना आज कुडाळ येथील न्यायालयाने साडेसात हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना अँटीकरप्शनकडून चौकशीची नोटीस बजावण्यात आल्यानंतर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात जाधव यांनी प्रक्षोभक भाषण केले होते. या प्रकरणी त्यांच्यासह अन्य १५ जणांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आणखी वाचा-नवी मुंबईतील नोएल तेक्केकारा यांचा देवसूमध्ये बुडून मृत्यू

यात खासदार अरविंद सावंत यांच्यासह भास्कर जाधव, अरुण दुधवडकर, संजय पडते, राजन शिवराम नाईक, गौरीशंकर खोत, सतीश सावंत, संतोष शिरसाट, रुपेश पावसकर आत्माराम उर्फ अतुल बंगे, संदेश पारकर, जान्हवी सावंत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, अभय शिरसाट, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जाधव यांच्यासह काहीजण आज हजर झाले होते.