सांंगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांच्यावर मनमाड येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा शिवप्रतिष्ठानकडून जाहीर निषेध करण्यात आला असून हा हल्ला पूर्व नियोजित होता असे पत्रक नगर प्रमुख अविनाश सावंत यांनी शुक्रवारी प्रसिद्धीस दिले आहे. तर भिडे गुरूजींंना विशेष पोलीस सुरक्षा पुरवण्याची आमदार सुधीर गाडगीळ यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भिडे गुरूजी मनमाडचा कार्यक्रम आटोपून धुळ्याला निघाले असता काही समाजकंटकांनी गुरूवारी रात्री मोटार अडवून हल्ल्याचा प्रयत्न केला. हा प्रकार म्हणजे पूर्वनियोजित कट होता असा आरोप नगर प्रमुख सावंत यांनी आपल्या पत्रकात केला असून असे प्रकार संघटनेचे कार्यकर्ते कदापि खपवून घेणार नाहीत, यापुढे जशास तसे उत्तर देऊ असेही या पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा – प्रकाश आंबेडकरांनी काढला नवा मुद्दा, म्हणाले, “आम्ही घराणेशाहीचा… “

हेही वाचा – बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेत शरद पवार यांचे नाव; जिल्हा प्रशासनाकडून सुधारित निमंत्रणपत्रिका

दरम्यान, भिडे गुरूजी हिंदू जनजागृतीसाठी व छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची महती सांगण्यासाठी दौरे करत असतात. त्यांच्यावर वेळोवेळी हल्ले करण्याचे प्रयत्न झाले आहेत. यामुळे त्यांना विशेष पोलीस संरक्षण देण्याची मागणी आमदार गाडगीळ यांनी एका निवेदनाद्बारे गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.