विधिमंडळात पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या कारणास्तव निलंबित झालेले धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आ. जयकुमार रावल यांच्यावर गुन्हा दाखल होण्याचा काही हा पहिलाच प्रसंग नव्हे. यापूर्वीही वकिलावर प्राणघातक हल्ला, जमाव जमवून दंगल घडविण्याचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न, नगरसेविकेचे अपहरण, बँकेच्या कर्जवाटपात अफरातफर, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आठ ते दहा गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे.
आ. रावल हे सलग दुसऱ्यांदा निवडून आले. तत्पुर्वी, ते दोंडाईचा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. दोंडाईचा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत. त्यातील एक प्रकरण २००६ मध्ये वकिलाच्या खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला असे आहे. या घटनेत अ‍ॅड. एकनाथ भावसार यांनी तक्रार दिली होती. उपरोक्त वर्षांत अशाच स्वरूपाच्या आणखी एका गुन्ह्यात रावल यांच्यासह पाच संशयित आहेत. भटू पाटील यांनी रावल व सहकाऱ्यांनी मारहाण केल्याची तक्रार दिलेली आहे. २००१ मध्ये बेकायदेशीर जमाव जमवून दंगलीच्या प्रयत्नात तर खुद्द तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी दोंडाईचा ठाण्यात तक्रार देऊन त्यांच्याविरूध्द कारवाई केली होती. रावल यांच्यावर काही गुन्हे इतर पोलीस ठाण्यातही दाखल आहेत. २००३ मध्ये त्यांच्या गटाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे रावल व त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्ञानेश्वर भामरे या पदाधिकाऱ्याच्या गाडीची तोडफोड केली. भामरे यांना पोलीस संरक्षणात जमावाच्या तावडीतून बाहेर काढावे लागले. या प्रकरणी भामरे यांनी रावल यांच्याविरुद्ध शिंदखेडा ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल आहे. या व्यतिरिक्त धाकदडपशा दाखवून शासकीय कामकाजात अडथळा आणण्यावरूनही याच पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. धुळे महापालिकेच्या निवडणुकीप्रसंगी आ. रावल यांनी विरोधी गटातील एका महिला नगरसेविकेचे अपहरण केल्याचा गुन्हा मोहाडी पोलीस ठाण्यात दाखल आहे.  
सध्या अवयासनात गेलेल्या दादासाहेब रावल सहकारी बँकेत बँकींग व्यवहारातील पैशांचे वाटप बेकायदेशीररित्या संचालक मंडळाने स्वत:साठी वापरले तसेच इतर आरोपींच्या कागदपत्रांची शहानिशा न करता कर्जवाटप करून अपहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातही बँकेचे संचालक असणाऱ्या रावल यांच्यासह अन्य संचालकांविरोधात दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, दोंडाईचा शहरात नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता त्यांनी भव्य घरकूल उभारण्याचे काम हाती घेतले. या प्रकरणी पालिकेने नोटीसा बजावूनही त्यांनी दाद दिली नाही. बांधकाम परवानगी वा नकाशे अद्याप त्यांनी पालिकेत सादर केले नसल्याचा आक्षेप आहे.
एवढेच नव्हे तर, दोन एकर शासकीय जागेवर त्यांनी अतिक्रमण केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. पालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप करून आ. रावल यांच्याकडून खोटय़ा तक्रारी केल्या जात असल्याचा ठराव काही वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आ. रावल हे सलग दुसऱ्यांदा निवडून आले. तत्पुर्वी, ते दोंडाईचा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. दोंडाईचा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत. त्यातील एक प्रकरण २००६ मध्ये वकिलाच्या खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला असे आहे. या घटनेत अ‍ॅड. एकनाथ भावसार यांनी तक्रार दिली होती. उपरोक्त वर्षांत अशाच स्वरूपाच्या आणखी एका गुन्ह्यात रावल यांच्यासह पाच संशयित आहेत. २००१ मध्ये बेकायदेशीर जमाव जमवून दंगलीच्या प्रयत्नात तर खुद्द तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी दोंडाईचा ठाण्यात तक्रार देऊन त्यांच्याविरूध्द कारवाई केली होती. रावल यांच्यावर काही गुन्हे इतर पोलीस ठाण्यातही दाखल आहेत.