सातारा:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे या महिन्यापासून मिळण्यास सुरुवात होईल. मात्र ज्या लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेऊनही विरोधात काम करतील, निवडणुकीनंतर त्यांची नावे या योजनेतून वगळली जातील, असे वक्तव्य साताऱ्यातील कोरेगावचे सत्ताधारी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेळाव्यात केले.

हेही वाचा >>> Sanjay Raut : “अनिल देशमुख आणि मी जेलमध्ये खिमा पाव बनवायचो”, राऊतांनी सांगितली तुरुंगातील दिनचर्या; कसाबच्या वस्तू पाहून म्हणाले…

Nagpur female missing
उपराजधानीतून वर्षभरात ५५९ मुली-महिला बेपत्ता, बेपत्तांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण जास्त
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
Rahul Gandhi in veer Savarkar defamation case
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना जामीन
eknath shinde and popat dhotre friendship news
‘लाडक्या मित्रा’च्या भेटीसाठी कायपण! एकनाथ शिंदे-पोपट धोत्रे यांच्या कान्हूरमधील मैत्रीची चर्चा
Minister Pankaja Mundes clarification on Anjali Damanias allegations
बीडमधील अधिकारी मी नेमलेले नाहीत, आरोपांबद्दल मंत्री पंकजा मुंडे यांचे स्पष्टीकरण
Santosh Deshmukh murder case All party pressure Dhananjay Munde Question on judicial inquiry
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीय दबाव,राज्यपालांची भेट; न्यायालयीन चौकशीवर प्रश्न
sanjay gaikwad controversial statement
Sanjay Gaikwad: “तुमच्यापेक्षा तर रांXX बऱ्या”, शिंदे गटाच्या आमदाराची मतदारांनाच शिवीगाळ, भर सभेत जीभ घसरली!

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठ्या संख्येने युवती व महिलांनी सहभाग नोंदवला आहे. या नोंदणीच्या आधारे सरकार मोठे शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असताना आमदार शिंदे यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. लाडकी बहीण योजेनवरून बोलताना त्यांनी मतदारसंघातल्या विरोधकांना थेट इशाराच दिला. निवडणुकीनंतर डिसेंबरमध्ये या योजनेसाठी तपासणी समितीची बैठक आहे, त्या बैठकीनंतर ‘लाडकी बहीण’ योजनेतून तुमची नावे वगळण्यात येतील, असे वादग्रस्त वक्तव्य आमदार शिंदे यांनी केले.

Story img Loader