वाई: मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडलेला नाही. आजही मी पक्षातच आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे आमचे दैवत आहे आणि अजित पवार हे आमचे सक्षम नेतृत्व असल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले. वाई येथील प्रयोगशील शिक्षक विठ्ठल माने यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस प्रताप पवार, वाई तालुका सूतगिरणीचे अध्यक्ष शशिकांत पिसाळ,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळसकर, किसन वीर खंडाळा तालुका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व्ही.जी. पवार, राजेंद्र तांबे आदी उपस्थित होते.

मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली नाही व सोडणार नाही. शरद पवार हे माझे दैवत आहेत आणि मी त्यांना कधीही विसरू शकत नाही. २००९ पासून या मतदार संघात जो विकास झाला आहे, तो केवळ अजितदादांसारख्या धडाकेबाज नेतृत्वामुळे झाला आहे. अन्य कोणामुळे नाही. शरद पवार महत्त्वाचे आहेतच. तितकेच अजितदादा ही महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांचे अश्रू पुसले पाहिजेत. कारखाना वाचला पाहिजे, असे कार्यकर्ते म्हणत होते. समोर बसलेल्या कार्यकर्त्यांनी किसन वीर कारखान्याची निवडणूक लढवून कारखाना ताब्यात घेण्याची मागणी वारंवार केली होती. मागील वर्षी कारखाना ताब्यात आल्यानंतर सभासदांनी दिलेल्या भांडवलावर कारखाना सुरू केला मागील वर्षभरात आपल्याला कोणत्याही बँकेने मदत केलेली नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.आता कारखाना सुरळीत चालवण्यासाठी अजितदादांचे मार्गदर्शन व मदतीची गरज असणार आहे त्याचा विचार करून आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला.

jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय

हेही वाचा… “देवेंद्र फडणवीस संभाजी भिडेंना गुरुजी म्हणत असतील तर…”, उद्धव ठाकरेंचा टोला

मतदार संघातील विकास कामांसाठी काही तडजोडी कराव्या लागतात. आपले सर्वस्व आहेत शरद पवार हे. आपले सर्वस्व आहेतच; आणि ते राहतीलच.त्यामुळे कार्यकर्त्यांनी, जनतेने मनात कोणताही किंतू परंतु ठेवू नये. मागील एक वर्षाच्या काळात आपले सरकार नव्हते.त्या काळात मतदार संघातील विकासकामांसाठी एक रुपयाही मिळाला नाही मागील वर्षी धोम धरणाच्या, पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी व जनजीवन पूर्वत करण्यासाठी कोणताही निधी मिळाला नव्हता.मात्र अजितदादांनी पुढाकार घेऊन यावेळी आपल्याला निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच त्या कामांना आता सुरुवात होईल. वाई शहरातील धोम धरणातून पाणीपुरवठा योजना, शहरात नवीन पूल, नाना नानी पार्क व कृष्णा नदीतील अनेक कामांना निधी उपलब्ध झाला आहे. ही कामे अनेक दिवस रखडलेली होती. ती आता मार्गी लागतील. खंडाळा तालुक्यात ट्रामा सेंटर महाबळेश्वर तालुक्यात अनेक छोट्या मोठ्या कामांना निधी उपलब्ध झाला आहे.

हेही वाचा… “गोरमेंट आंटी खरं बोलली, शरद पवार लग्न एकाशी करतात अन्…”, मीम शेअर करत प्रकाश आंबेडकराकडून बोचरी टीका!

२००९ मध्ये माढा मतदारसंघातून शरद पवार लोकसभेचे उमेदवार होते. त्यांचे मूळ गाव नांदवळ (ता. कोरेगाव) येथे शरद पवार यांची सभा होती.या सभेमध्ये सूत्रसंचालन केल्यामुळे सरकारी नोकरीत असलेल्या विठ्ठल माने यांना आचारसंहितेचा भंग केल्यामुळे निलंबित करण्यात आले होते.मात्र अजित पवार यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच विठ्ठल माने यांना पुन्हा सेवेमध्ये संधी मिळाली, याची आठवण मकरंद पाटील यांनी करून दिली