वाई: कोणत्याही परिस्थितीत नीरा देवघर व धोम बलकवडी धरणाचे खंडाळ्याच्या हक्काचे पाणी अजिबात बाहेर जाऊ देणार नाही.पाणी घेऊन जाण्याच्या घोषणा करत फिरणाऱ्यांनी खंडाळ्याच्या पाण्याबाबत अजिबात बोलू नये असा इशारा आमदार मकरंद पाटील यांनी खेड तालुका खंडाळा येथे दिला.

हेही वाचा >>> सोलापुरात २० हजार कर्मचारी संपात सहभागी; प्रशासकीय कामकाज ठप्प

कायम दुष्काळी खंडाळा तालुक्यात धोम बलकवडी व नीरा देवघरचे पाणी आल्यामुळेच तालुक्याचा दुष्काळी टिळा पुसला जात आहे. मात्र आपल्या मतदारसंघातील जनतेला खुश करण्यासाठी काही नेते निरा देवघर आणि धोम बळकवडीच्या पाण्याबद्दल बोलत आहेत. मुळात या दोन्ही धरणावरील पाण्यावर खंडाळा तालुक्याचा पहिला हक्क आणि अधिकार आहे. कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत खंडाळा तालुक्याच्या हक्काचे सर्व पाणी खंडाळा तालुक्याला मिळत नाही तोपर्यंत पाण्याचा एक थेंबही पुढे जाऊ देणार नाही. शासनाने पाण्याच्या कामासाठी नव्याने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. ही मंजुरी नियमित मंजुरीचा कामाचा एक भाग आहे आणि अशी प्रशासकीय मंजुरी शासनाला कोणाचेही सरकार असले तरी द्यावीच लागते. मात्र काही लोक मी प्रशासकीय मंजुरी आणली अशा पद्धतीची भाषा करत फिरत आहेत. लवकरच आपल्या मतदारसंघात नीरा देवघरचे आणि धोम बलकवडीचे पाणी येणार अशा वलग्ना करत फिरत आहेत. मात्र त्यांनी खंडाळ्याच्या पाण्याचा अनुशेष भरून काढल्याशिवाय पाणी मिळणार नाही हे लक्षात ठेवावे.

हेही वाचा >>> भावाच्या अटकेवर पहिल्यांदाच बोलले रामदास कदम, अनिल परबांना लक्ष्य करत म्हणाले…

खंडाळा तालुक्याला नीरा देवघर धरणाचे ३.५ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय शिरवळ  येथील बैठकीत शरद पवार यांनी घेतल्यामुळेच खंडाळ्याला नीरा देवघरचे पाणी मिळाले आहे. पाणीप्रश्नी कुणी कितीही गप्पा मारू दया. खंडाळा तालुक्याच्या हक्काचा पाण्याचा एक थेंबही तालुक्याबाहेर जावु देणार नाही, नीरा देवघरला प्रशासकीय मान्यता देणे ही सरकारची जबाबदारी असुन त्यांचे लाडु व पेढे कशाला वाटताय असे प्रतिपादन आमदार मकरंद पाटील यांनी केले. खेड बुद्रुक( ता खंडाळा) येथे करण्यात आलेल्या १० कोटी रुपयाच्या विविध विकास कामाचे भुमीपुजन व उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बकाजीराव पाटील,उदय कबुले,दत्तानाना ढमाळ, नितीन भरगुडे – पाटील, मनोज पवार,डॉ नितीन सावंत, शामराव गाढवे, राजेंद्र तांबे, रमेश धायगुडे, सुचेता हाडंबर, नितीन ओव्हाळ,सुरेश रासकर,खेड बुद्रुकचे सरपंच गणेश धायगुडे – पाटील आदी मान्यवराची प्रमुख उपस्थिती होती.